Join us  

या गंभीर आजाराचा सामना करतेय अभिनेत्री श्रुती हसन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 7:34 PM

1 / 5
अभिनेत्री श्रुती हसन पीसीओएस आणि एण्डोमेट्रीओसिस (PCOS and Endometriosis) या आजाराशी लढा देतेय. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
2 / 5
पीसीओएस आणि एण्डोमेट्रीओसिस या संदर्भात डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू असणारी औषधे आणि त्याच्या जोडीला परफेक्ट वर्कआऊट असं जर नियमितपणे केलं तर नक्कीच हा त्रास कमी होण्यास मदत होईल. Work out with me अशी कॅप्शनही श्रुतीने तिच्या व्हिडिओला दिली आहे.
3 / 5
या पोस्टमध्ये ती म्हणतेय की हार्मोनल इम्बॅलेन्स, मेटाबोलिक प्रॉब्लेम्स आणि शिवाय पीसीओएस आणि एन्डोमेट्रीओसिस या सगळ्या त्रासांविरुद्ध लढणं सोपं नाही
4 / 5
पण मी या सगळ्यांकडे अतिशय सकारात्मकतेने बघते आहे आणि त्यावर मात करण्यासाठी मी काही नैसर्गिक उपाय करते आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि रेग्युलर वर्कआऊट हे ३ उपाय करून श्रुती तिच्या आजारावर मात करते आहे.
5 / 5
ती म्हणते की अजून मी बरी झालेली नाही my body isn’t perfect right now. पण माझं मन मात्र आनंदी आहे. हे हॅप्पी हार्मोन्स असेच माझ्या शरीरात राहोत.. माझा हा त्रास मी एक चॅलेन्ज म्हणून स्विकारला असून हा लहानसा व्हिडिओ आणि या आजारांवरील उपाय शेअर करण्याचा आपल्याला आनंद आहे, असंही तिने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
टॅग्स :श्रुती हसनTollywood