Join us  

श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 3:32 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचं (Shraddha Kapoor) नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्यासोबत तिचं अफेअर होतं. मात्र श्रद्धा सध्या सिंगल आयुष्य एनजॉय करत आहे.
2 / 8
दुसरीकडे श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरने (Siddhanth Kapoor) त्याचं नातं ऑफिशियल केलं आहे. सिद्धांत गर्लफ्रेंडसोबत बऱ्याच पार्टी, इव्हेंट्समध्ये दिसला. गेल्या वर्षभरापासून सिद्धांत रिलेशनशिपमध्ये आहे. श्रद्धा कपूरची ही होणारी वहिनी आहे तरी कोण?
3 / 8
सिद्धांत कपूरने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत 'एक साल मुबारक' असे कॅप्शन दिले होते. या फोटोवर वडील शक्ती कपूर यांनी 'मेड फॉर इच अदर' अशी कमेंट केली होती. तर इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या.
4 / 8
सिद्धांतच्या गर्लफ्रेंडचं नाव अंतरा राजकुमारी (Antara Rajkumari) असं आहे. भल्याभल्या अभिनेत्रींनाही टक्कर देईल इतकी ती दिसायला सुंदर आहे. मात्र अंतरा अभिनेत्री नसून DJ आहे. ती अनेक क्लब, इव्हेंट्समध्ये डीजे चं काम करते.
5 / 8
नुकताच अंतराने सिद्धांतसोबत दोन फोटो शेअर केले. ट्रेडिशनल वेअरमधील या फोटोत दोघंही खूप छान दिसत आहेत. 'तुझ्यासोबत मी नेहमीच खूश असते' असं कॅप्शन अंतराने दिलं आहे. त्यांच्या या फोटोवरही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
6 / 8
दोन वर्षांपूर्वी सिद्धांतला ड्रग्स केसप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. तेव्हा सिद्धांतने पहिल्यांदा अंतरासोबतचा फोटो पोस्ट करत नि:श्वास सोडला होता. त्या फोटोत अंतराने मास्क लावला होता.
7 / 8
श्रद्धा कपूरचा होणाऱ्या गर्लफ्रेंडसोबच खास बाँड आहे. दोघींच्या फोटोंमधून ते लगेच लक्षात येतं. श्रद्धा आणि अंतरा अनेकदा एकमेकींसोबत पार्टी करताना दिसतात.
8 / 8
तसेच सिद्धांतच्या कुटुंबासोबत अंतरा अनेकदा बाहेर फिरायला गेली आहे. सिद्धांतच्या कुटुंबासोबत तिचेही फोटो सोशल मीडियावर दिसतात. त्यामुळे लवकरच सिद्धांत कपूर लग्नही करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
टॅग्स :श्रद्धा कपूरपरिवारबॉलिवूड