Join us  

IN PICS : रातोरात उद्ध्वस्त झालं ‘या’ कलाकारांचं करिअर, छोटीशी चूक पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 8:00 AM

1 / 9
विवेक ओबेरॉयने 2002 साली रामगोपाल वर्माच्या कंपनी या चित्रपटातून डेब्यू केला होता. पुढच्याच वर्षी ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटाच्या सेटवर विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मग काय, ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेन्ड सलमान खान त्याच्या मार्गात आला. विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर अनेक गंभीर आरोप केलेत. पण याचा सलमानच्या करिअरवर काहीही परिणाम झाला नाही. याऊलट विवेकच्या करिअरवर मात्र जणू फुलस्टॉप लागला.
2 / 9
शक्ती कपूर यांचं करिअर चांगलं सुरू होतं. पण 2005 मध्ये शक्ती कपूर एका स्टिंग आॅपरेशनमध्ये अडकले. एका तरूणीला चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात ते सेक्शुअल फेवर मागताना दिसले. या स्कँडलनंतर शक्ती कपूरच्या करिअरलाही ब्रेक लागला. आताश: ते क्वचित एखाद्या सिनेमात दिसतात.
3 / 9
फिरोज खानचा मुलगा फरदीन खान हा चॉकलेटी हिरो. करिअर जोमात असताना 2001 साली त्याच्यावर ड्रग्ज खरेदी करण्याचा आरोप झाला आणि त्याच्या करिअरला ओहटी लागली. लवकरच फरदीन नो एंट्रीमधून वापसी करणार असल्याची चर्चा आहे.
4 / 9
शाइनी आहुजाने हजारों ख्वाहिशें ऐसी, गँगस्टर, भुल भुलैय्या अशा अनेक चित्रपटात काम केलं. पण 2009 मध्ये त्याच्यावर मोलकणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. त्याला अटकही झाली. तेव्हापासून शाईनी अहुजाचं करिअर संपलं ते संपलंच.
5 / 9
मनीषा कोईराला हिचं नावही या यादीत आहे. अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर एका वळणावर ती दारूच्या आहारी गेली होती. असं म्हणतात की, तिच्या या व्यसनामुळे तिला काम मिळणं बंद झालं. यानंतर कॅन्सर झाल्यानं तिने ब्रेक घेतला. अर्थात आता तिने कमबॅक केलंय.
6 / 9
ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. चाहते तिच्यावर फिदा होते. पण करिअर पिकवर असताना तिचं नाव अंडरवर्ल्डशी जुळं आणि तिला सिनेमे मिळणं जणू बंद झालं. अनेक वर्षानंतर ममता कुलकर्णीचा एक फोटो समोर आला होता. या ती साध्वीच्या रूपात दिसली होती.
7 / 9
अमन वर्मा एकेकाळी टीव्हीचा लोकप्रिय चेहरा होता. अनेक सिनेमातही त्याने काम केलं. पण 2005 साली एका न्यूज चॅनलच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये त्याला एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी करताना दाखवलं गेलं आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
8 / 9
कोईना मित्रा एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. पण अधिक सुंदर दिसण्याच्या नादात तिने प्लॅस्टिक सर्जरी केली आणि मोठी चूक करून बसली. या सर्जरीने तिचा चेहरा बिघडला आणि तिला काम मिळणं बंद झालं.
9 / 9
अभिजीत भट्टाचार्य हा बॉलिवूडचा एकेकाळचा लोकप्रिय पार्श्वगायक होता. पण आज त्याच्याकडे काम नाही. बॉलिवूडमधील खान मंडळींविरोधात बयानबाजी करणं त्याला महाग पडलं. यानंतर इंडस्ट्रीत त्याला काम मिळणंच बंद झालं.
टॅग्स :बॉलिवूडशक्ती कपूरविवेक ऑबेरॉयमनिषा कोईरालासेलिब्रिटी