Join us  

Shahid Kapoor : "मला माफ करा..."; लेकीच्या जन्मानंतर शाहिद कपूर प्रचंड घाबरला, झाली होती 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 1:29 PM

1 / 12
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच बोलत असतो. लग्नानंतर शाहिद खूप आनंदी असून त्याला दोन गोड मुलं आहेत.
2 / 12
शाहिद कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मुलगी मीशाच्या जन्मावेळी तो खूप जास्त घाबरला होता. एवढंच नाही तर त्याने त्यावेळी मीराच्या वडिलांना फोन करून माफीही मागितली.
3 / 12
कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपूरने 2016 सालाबद्दल सांगितलं. त्याची मुलगी मीशाचा जन्म याच वर्षी झाला. आपल्या मुलीच्या जन्माबद्दल बोलताना शाहिद म्हणाला - 'मीशाच्या जन्मानंतर मी खूप आनंदी होतो पण खूप घाबरलो होतो.'
4 / 12
'मला मुलगी झाली होती. जेव्हा तुम्ही एका मुलीचे वडील बनता तेव्हा तुम्हाला खूप वेगळं वाटतं. मीशाच्या जन्मानंतर मी सर्वात आधी मीराच्या वडिलांना फोन केला होता.'
5 / 12
'मी त्यांना फोनवर म्हटलं की - लग्नात जर मी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी माफी मागतो, मला माफ करा. मला आता समजलं आहे की, मला एक मुलगी आहे आणि तिचंही एक दिवस लग्न होणार आहे.'
6 / 12
मीशाच्या जन्मानंतर शाहिदच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. नेहा धुपियाच्या शोमध्ये त्याने मीशाच्या जन्मानंतर स्मोकिंग सोडल्याचं सांगितलं होतं. मुलीच्या जन्मानंतर त्याने ही वाईट सवय सोडण्याचा निर्णय घेतला होता.
7 / 12
'मी जेव्हा स्मोकिंग करायचो तेव्हा मी माझ्या मुलीपासून लपून सिगारेट ओढायचो. किंबहुना म्हणूनच मी ते सोडलं' असं शाहिदने म्हटलं आहे.
8 / 12
शाहिद अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे मस्त फोटो शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.
9 / 12
शाहीद आणि मीरा यांचे 2015 मध्ये लग्न झालं होतं. 2016 मध्ये मीराने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2018 मध्ये मीराने मुलगा झैनचा जन्म झाला. ते दोघंही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत.
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूड