Join us

लीजा हेडनचा नवा अवतार बघून चाहत्यांनी म्हटले ‘सेक्सी मॉम’, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

मॉडेल आणि अभिनेत्री लीजा हेडन ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आई बनल्यापासून सातत्याने ती मुलगा जॅकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यावेळेस मात्र लीजाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. फोटोमध्ये लीजाने तिच्या केसांवर एक्सपेरिमेंट केल्याचे दिसून येते. कारण तिचे केस गोल्डन कलरचे दिसत असून, ती या अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे, पाहा तिचे फोटो!

मॉडेल आणि अभिनेत्री लीजा हेडन ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आई बनल्यापासून सातत्याने ती मुलगा जॅकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यावेळेस मात्र लीजाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. फोटोमध्ये लीजाने तिच्या केसांवर एक्सपेरिमेंट केल्याचे दिसून येते. कारण तिचे केस गोल्डन कलरचे दिसत असून, ती या अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे, पाहा तिचे फोटो!लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.लीजाने आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले. तिने अभिनेत्री कंगना राणौतबरोबर ‘क्वीन’ या चित्रपटात काम केले. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले.याव्यतिरिक्त लीजाने अनुष्का शर्मा, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चन स्टारर ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.दरम्यान, लीजाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी सेक्सी मॉम म्हणून कॉमेण्ट दिल्या.लीजा तिच्या मुलाचे फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करीत असते.‘क्वीन’मधून प्रसिद्धी झोतात आलेल्या लीजा हेडनने १७ मे २०१७ रोजी जॅक नावाचा मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी लीजाने बिझनेसमॅस डीनो ललवानी याच्याशी लग्न केले होते.