SEE SUPER CUTE PICS : मीडियाही झाला तैमूर अली खानच्या प्रेमात वेडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 13:55 IST
तैमूर अली खान कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अगदी तैमूरची पहिली झलक आली अन् सगळेच त्याच्या प्रेमात पडलेत. क्यूट स्माईल, ...
SEE SUPER CUTE PICS : मीडियाही झाला तैमूर अली खानच्या प्रेमात वेडा!
तैमूर अली खान कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अगदी तैमूरची पहिली झलक आली अन् सगळेच त्याच्या प्रेमात पडलेत. क्यूट स्माईल, गोलमटोल गाल आणि सुंदर निळे डोळे अशा गोंडस तैमूरच्या कोण प्रेमात पडणार नाही? आई करिना कपूर खानसोबत अलीकडे तैमूर बराच बाहेर पडायला लागला आहे आणि केवळ घराबाहेरच नाही तर स्वत:चे सेलिब्रिटी स्टेट्सही मिरवू लागला आहे. विश्वास बसत नाही तर, कालचे हे फोटो तुम्ही पाहायलाच हवेत. काल तैमूर आई करिनासोबत तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य याच्या पहिल्या वाढदिवसाला पोहोचला. या पार्टीत तैमूरचा रूबाब बघण्यासारखा होता. नाही म्हणायला तैमूर आईच्या कडेवर होता. मीडियाचे सगळे कॅमेरे त्याच्यावर खिळले होते. पण तैमूर जराही विचलित झाला नाही. आईच्या कडेवर तैमूर आला, पार्टी एन्जॉय केली आणि घरी परतला. यावेळी आईने तैमूरला मीडियाला टाटा करायला शिकवले. पण गोंडस तैमूर मात्र आपल्याच नादात गुंग होता. मीडियाला फार भाव न देता आपल्यातच मस्त होता. त्याचा तो क्यूट अंदाज पाहण्यासारखा होता. तो इतका क्यूट दिसत होता की, मीडियालाही करिनाला सोडून या छोट्या नवाबाच्या प्रेमात पडला होता. आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट अशा स्टाईलिश अंदाजातील तैमूरचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सध्या तैमूरचे हे फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. छोट्या नवाबाचा हा रूबाब तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कळवायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.