SEE PICS : उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
गणरायाचे आगमन झाल्यापासून सगळीकडे चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही गणरायाच्या भेटीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अलीकडेच उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी अंधेरीतील राजाचे दर्शन घेतले.
SEE PICS : उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!
गणरायाचे आगमन झाल्यापासून सगळीकडे चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही गणरायाच्या भेटीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अलीकडेच उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी अंधेरीतील राजाचे दर्शन घेतले. उर्वषी रौतेलाने गणरायाचे भक्तीभावपूर्ण दर्शन घेतले. पूनम पांडे देखील अनारकली ड्रेसमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. बाप्पाची भव्य मूर्ती किती लोभसवाणी वाटते आहे. फिक्या हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये आलेली उर्वषी रौतेला आल्यावर तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूनम पांडे हिने भक्तीभावाने गणेशाची आराधना केली. उर्वषी आणि पूनम बाप्पांच्या दर्शनासाठी येणार म्हटल्यावर गर्दी ही होणारच. पूनम पांडे हिने गणरायापुढे लीन होऊन त्याचे दर्शन घेतले.