Join us

see pics: ​एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर बेभान झाली सनी लिओनी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 12:22 IST

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी हिचा हॉट अदा तुम्ही नेहमीच पाहता. पण आज आम्ही तुम्हाला सनीचे वेगळे ...

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी हिचा हॉट अदा तुम्ही नेहमीच पाहता. पण आज आम्ही तुम्हाला सनीचे वेगळे रूप दाखवणार आहोत. सनीचे हे रूप पाहून तुमचे चांगलेच मनोरंजन होईल, यात शंका नाही. अलीकडे सनी एका इव्हेंटमध्ये पाहोचली. याठिकाणी सनी एनर्जी ड्रिंकचा अख्या टीन पोटात रिचवला आणि मग काय, सनी सगळेच होश विसरली. हे ड्रिंक पिल्यानंतर सनीच्या अंगात इतकी एनर्जी संचारली की, तिचा पती डेनियल वेबर यालाही तिला सांभाळणे कठीण होऊन बसले. ALSO READ : OMG !! ‘बेपर्वा’ ​सनी लिओनीची पुन्हा एक ‘हॉट’ जाहिरात!मग काय, सनीने डेनियलला आपल्या तालावर चांगलेच नाचवले. सनीने या इव्हेंटचे हे मस्त मस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये कधी ती पती डेनियलच्या गळ्यात पडताना दिसतेय तर कधी चक्क उड्या मारताना दिसते. हे सर्व फोटो ड्रिंक केल्यानंतरचे आहेत, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. एनर्जीटीक सनीचे हे फोटो तुम्हाला पाहायलाच हवे.पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी सध्या जोरात आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर सनी लिओनी आता साऊथकडे निघालीयं. सनीने आता  दाक्षिणात्य चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. दिग्दर्शक प्रवीण सुत्तारू यांच्या ‘पीएसव्ही गरुडा वेगा’ या आगामी तामिळ चित्रपटात सनी थिरकताना दिसणार आहे.अलीकडे ‘रईस’ या चित्रपटात सनी ‘लैला’ या आयटम साँगवर थिरकताना दिसली होती. या गाण्याच्या निमित्ताने किंगखान शाहरूख खान याच्यासोबत काम करण्याचे सनीचे स्वप्न सत्यात उतरले होते.  ‘लैला’ गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते.