Join us

SEE PICS : ​‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल’ ईशा गुप्ताच्या आयुष्यातील ‘हा’ १८ वर्षाचा तरूण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:53 IST

ईशा गुप्ता बॉलिवूडपेक्षा सोशल मीडियावर अधिक लोकप्रीय आहे. आता तर ईशा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सध्या ...

ईशा गुप्ता बॉलिवूडपेक्षा सोशल मीडियावर अधिक लोकप्रीय आहे. आता तर ईशा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सध्या ईशाचे सोशल मीडियावरचे काही फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. विश्वास ठेवणेही कठीण होईल्न, असे हे फोटो आहेत. आता या फोटोत असे काय आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागली असेल तर, हे फोटो स्वत: ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो शेअर करताना ईशाने जे कॅप्शन लिहिलेय, ते पाहून सोशल मीडिया युजर्सच्या भुवया उंचावल्या आहेत.हा फोटो आहे, ईशाच्या १८ वर्षांच्या अतिशय जवळच्या मित्राचा. अनेक फोटोंमध्ये हा १८ वर्षांचा मित्र ईशाला किस करताना दिसतोय.या ईशालफोटोला ‘माय वन अ‍ॅण्ड ओन्ली’ आणि ‘माय लव्ह’ अशी कॅप्शन्स दिली आहेत. काही दिवसांपूर्वी ईशा दुबईत गेली होती. हे फोटो त्याचदरम्यानचे आहेत.ALSO READ : ईशा गुप्ताच्या ओठांना एका रात्रीत झाले तरी काय? ओळखणेही झाले कठीण!!ईशाच्या या खास मित्राचे नाव अली रजा बेग आहे. इन्स्टाग्रामवर   @slapvibes नावाने त्याचे अकाऊंट आहे. ३२ वर्षांच्या ईशाची १८ वर्षांच्या अलीसोबतची मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. मध्यंतरी ईशा अलीला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. अर्थात ही चर्चा रंगण्यामागेही कारण होते. Happy 18th to my one n only. My baby boy I love you the most, please always stay this happy child that you are. I’ve always got your back’. असे अलीच्या १८ व्या बर्थ डेला विश करताना ईशाने लिहिले लिहिले होते. यावरून ईशा ट्रोलही झाली होती. यावर ट्रोलर्सला उत्तर देताना, ‘ये मेरा बेबी है, बॉयफ्रेन्ड नहीं. आप लोगों की मानसिकता ही बीमार है,’ असे ईशाने लिहिले होते.अली हा फॅशन ब्रँड  Splashचा मालक रजा बेग याचा मुलगा आहे.  Splashने कॅटरिना कैफ व सलमान खान सारख्या मोठ्या स्टार्ससाठी कपडे डिझाईन केले आहेत.