Join us  

संजय दत्तची पहिली पत्नी होती लोकप्रिय अभिनेत्री; 'या' कारणामुळे झाला तिचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 12:48 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा कित्येकदा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे.
2 / 10
यात १९९३ चा बॉम्बस्फोट असो वा त्याचं वैवाहिक आयुष्य असो त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते.
3 / 10
सध्या सोशल मीडियावर संजयच्या पहिल्या पत्नीची चर्चा रंगली आहे.
4 / 10
संजयच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा शर्मा असं होतं. मात्र, खूप कमी वयात तिने जगाचा निरोप घेतला.
5 / 10
ऋचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ऋचाचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मात्र, अभिनेत्री होण्यासाठी तिने मुंबई गाठली.
6 / 10
हम नौजवान या सिनेमामध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर तिने 'अनुभव', 'इन्साफ की आवाज', 'सडक छाप' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
7 / 10
१९८७ मध्ये 'आग ही आग' या सिनेमाच्या सेटवर तिची आणि संजय दत्तची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. परंतु, लग्नानंतर ऋचाने एकाही चित्रपटात काम केलं नाही.
8 / 10
संजय-ऋचाचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरु असतानाच तिला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं. यासाठी ती अमेरिकेत उपचार घेत होती.
9 / 10
एकीकडे ऋचावर उपचार सुरु होते तर दुसरीकडे संजयचं नाव माधुरी दीक्षितसोबत जोडलं जात होतं. यामध्येच संजयने अचानकपणे ऋचाला घटस्फोट देत सगळ्यांना धक्का दिला
10 / 10
घटस्फोटानंतर ऋचा मानसिकरित्या खचून गेली. ज्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली आणि 10 डिसेंबर 1996 रोजी ऋचा शर्माचं निधन झालं होतं.
टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा