इतकीच विनंती करते..., घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर सामंथानं ट्रोलर्सला दिलं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 1:42 PM1 / 7साऊथस्टार सामंथा रूथ प्रभू हिचा नुकताच घटस्फोट झाला. अभिनेता नागा चैतन्यसोबतचा तिचा संसार अवघ्या 4 वर्षांत मोडला. या घटस्फोटानंतर सामंथा प्रचंड ट्रोल झाली होती. आता तिनं या ट्रोलर्सला अतिशय विनम्र भाषेत उत्तर दिलं आहे.2 / 7 2 ऑक्टोबर 2021 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामंथा व नागा चैतन्य यांनी आपल्या घटस्फोटाची बातमी जाहीर केली होती. अनेकांनी या घटस्फोटासाठी समंथाला जबाबदार ठरवत सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. 3 / 7सुरूवातीला सामंथाने या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं. पण आता तिनं चुप्पी तोडत उत्तर दिलं आहे. ‘एले इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती तिच्या आध्यात्मिक आध्यात्मिक विचारांवर बोलली.4 / 7 जी अपेक्षा केली होती, तेच माझ्यासोबत घडलं. आयुष्यातील काही गोष्टी अचानक कायमस्वरूपी बदलतात. पण या सर्व गोष्टी सहन करण्याची पुरेशी ताकद देवानं मला दिली आहे. लॉकडाउनदरम्यान मी मेडिटेशन करायला सुरुवात केली, असं ती म्हणाली.5 / 7 मी नेहमी लोकांना आपापली मतं मांडण्याासठी प्रोत्साहित करते. पण, तरीही आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि करुणेची भावना तर नक्कीच बाळगू शकतो अतिशय सभ्य पद्धतीनं त्यांनी आपली नाराजी व्यक्त करावी, केवळ इतकी विनंती मी लोकांना करू शकते, असं ट्रोल करणा-यांबद्दल ती म्हणाली.6 / 7काही दिवसांपूर्वी सामंथानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘हा अनुभव आयुष्यातील सर्वांत मोठा धडा होता. मला अजून खूप काही शिकायचं आहे’, अशी ती पोस्ट होती.7 / 7त्याआधर एका पोस्टमध्ये तिनं चेरिल स्ट्रॉयडचा कोट शेअर केला होता. ‘अनेक गोष्टी ठीक होतील मात्र, सर्वकाही ठीक नाही होणार. कधी-कधी तुम्ही योग्य असूनही तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. कष्टाला पर्याय नाही याचीही तुम्हाला जाणीव होईल. त्यामुळे झालं गेलं विसरून परिस्थिती स्वीकारा’,अशा आशयाचं ते कोट होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications