Join us  

'पुष्पा'नंतर सामंथाने वाढवलं मानधन, इतक्या कोटीत साईन केला ‘यशोदा’ हा नवा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 3:53 PM

1 / 8
सामंथा रूथ प्रभु ही तेलगू सिनेसृष्टीतील महागडी अभिनेत्री. आता तर सामंथा चांगलीच ‘महाग’ झाली आहे.
2 / 8
होय, पुष्पा या सिनेमातील तिचं आयटम साँग अन् ‘फॅमिली मॅन 2’मध्ये तिने साकारलेली राजी सगळंच अफलातून. साहजिकच यानंतर सामंथाचे भाव वाढले नसतील तर नवल.
3 / 8
‘फॅमिली मॅन 2’च्या सुपर सक्सेसनंतर सामंथाने तिची पहिली पॅन इंडिया फिल्म ‘यशोदा’ साईन केली आहे. या चित्रपटासाठी सामंथाने तगडी फी वसूल केली आहे.
4 / 8
आधी सामंथा एका सिनेमासाठी 2 कोटी रूपये फी घ्यायची. पण ‘पुष्पा’च्या एकाच गाण्यासाठी तिने 1.5 कोटी घेतले. आता तिने चित्रपटाची फी देखील वाढवली आहे.
5 / 8
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, यशोदा या चित्रपटासाठी सामंथाने 3 कोटी फी घेतली आहे.
6 / 8
यशोदा हा एक सायन्स फिक्शन थ्रीलर सिनेमा आहे. यात सामंथा लीड रोलमध्ये दिसणार आहे.
7 / 8
यशोधा या चित्रपटाचं बजेट 30 कोटी रूपये असल्याचं कळतंय. हरीश शंकर व हरीश नारायण हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
8 / 8
सामंथाचा हा सिनेमा तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा एकूण 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसेलिब्रिटीपुष्पा