साजिद यांचा छोट्या पडद्यावर ‘मोठा धमाका’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:09 IST
ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिर्सच काऊन्सिल इंडिया ही संस्था चित्रपटांच्या वर्ल्ड टीव्ही प्रिमिअर संदर्भातील आकडेवारी गोळा करते. ही आकडेवारी टीआरपीच्या स्वरूपातील ...
साजिद यांचा छोट्या पडद्यावर ‘मोठा धमाका’
ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिर्सच काऊन्सिल इंडिया ही संस्था चित्रपटांच्या वर्ल्ड टीव्ही प्रिमिअर संदर्भातील आकडेवारी गोळा करते. ही आकडेवारी टीआरपीच्या स्वरूपातील असल्याने कोणत्या चित्रपटाला किती दर्शक लाभले, याची माहिती अगदी सहज मिळते. नुकतीच या काऊन्सिलने यंदाची म्हणजे 2016 वर्षांची आक डेवारी जाहीर केली आहे. यात ‘ढिशूम’ पहिले, ‘हाऊसफुल-3’ दुसरे तर ‘बागी’ने तिसरे स्थान मिळविले. याचा अर्थ असा की,या तिन्ही चित्रपटांना वर्ल्ड टीव्ही प्रिमिअर दरम्यान सर्वाधिक दर्शक लाभले. काऊन्सिलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ‘ढिशूम’ला 95 लाख 44 हजार, ‘हाऊसफुल 3’ 78 लाख 16 हजार, ‘बागी’ 69 लाख 88 हजार, ‘दिलवाले’ 67 लाख 61 हजार, ‘सनम रे’ 56 लाख 76 हजार, ‘बाजीराव मस्तानी’ 54 लाख 76 हजार, ‘घायल वन्स अगेन’ 38 लाख 61 हजार व फॅन या चित्रपटाला टीव्हीवर 34 लाख 18 हजार दर्शक लाभले. या आकडेवारीतील ठळक बाब म्हणजे, वर्ल्ड टीव्ही प्रिमिअर दरम्यान सर्वाधिक दर्शक लाभलेले टॉपचे तिन्ही चित्रपट (ढिशूम, हाऊसफुल-3 व बागी) साजिद नाडियाडवाला यांचे आहेत. एकंदर काय तर साजिद आता छोट्या पडद्यावरील शोमॅन झाले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये साजिद यांनी ‘किक’, ‘हिरोपंती’, ‘हायवे’, ‘2 स्टेट्स’ सारख्या शानदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोठ्या पडद्यावर मोठे यश मिळविल्यानंतर छोट्या पडद्यावरही त्यांनी जोरदार धमाका केला. यंदाच्या छोट्या पडद्यावरील गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदकांवर त्यांचेच नाव कोरले गेले आहे.