Join us  

PHOTOS : सई मांजरेकरनं मॅगझिनसाठी केलं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 2:09 PM

1 / 7
निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरनं सलमानसोबत ‘दबंग 3’मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. सध्या सईची एका वेगळ्याच कारणानं चर्चा आहे. (photos-FHM India)
2 / 7
होय, सईचं ग्लॅमरस अन् बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. ‘एफएचएम फिट’ या मॅगझिनसाठी तिनं हे फोटोशूट केलं आहे.
3 / 7
‘एफएचएम फिट’च्या एप्रिल महिन्याच्या कव्हरपेजवर सई झळकली आहे. सईने या फोटोशूटचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
4 / 7
या फोटोत सई एकापेक्षा एक ग्लॅमरस पोझ देताना दिसतेय. तिचा हटके मेकअप लक्ष वेधून घेतोय.
5 / 7
सई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. तिने सलमान खान सोबत ‘दबंग 3’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
6 / 7
‘दबंग 3’नंतर सई आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात दिसली होती. लवकरच ती ‘मेजर’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय घानी नावाचा चित्रपटही तिने साईन केला आहे.
7 / 7
सई मध्यतंरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सई प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत असल्याची चर्चा होती.
टॅग्स :सई मांजरेकरमहेश मांजरेकर बॉलिवूड