Join us  

OMG! या कलाकारांना ऑफर करण्यात आले होते हे सुपरहिट चित्रपट, पण त्यांनी दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:17 PM

1 / 5
हम दिल दे चुके सनम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. पण या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली चॉईस ऐश्वर्या नव्हे तर करिना कपूर होती.
2 / 5
गदर एक प्रेम कथा हा चित्रपट सुरुवातीला काजोलला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव तिला या चित्रपटात काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे या चित्रपटासाठी अमिषा पटेलची निवड करण्यात आली.
3 / 5
रंग दे बसंती या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले होते. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटातील आमिर खानची भूमिका हृतिक रोशनला ऑफर करण्यात आली होती. पण मल्टीस्टारर चित्रपटात काम करण्यास हृतिक तयार नसल्याने त्याने या चित्रपटासाठी नकार दिला होता.
4 / 5
राजा हिंदुस्तानी या चित्रपटासाठी जुही चावला आणि आमिर खान यांची निवड करण्यात आली होती. त्याकाळात त्या दोघांची जोडी खूप फेमस असल्याने त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र आणण्याची या चित्रपटाच्या टीमची इच्छा होती. पण जुहीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि या चित्रपटात करिश्मा कपूरची वर्णी लागली. या चित्रपटातील करिश्माच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील अभिनयासाठी तिला पुरस्कार देखील मिळाले.
5 / 5
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाने आजवरचे बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटातील राज म्हणजेच शाहरुख खानच्या आजही फॅन्स प्रेमात आहेत. हा चित्रपट शाहरुखच्या आधी सैफ अली खानला ऑफर करण्यात आला होता.
टॅग्स :करिना कपूरऐश्वर्या राय बच्चनकाजोलअमिषा पटेलआमिर खानहृतिक रोशनजुही चावला करिश्मा कपूरशाहरुख खानसैफ अली खान