Join us  

In Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी? सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर

By रूपाली मुधोळकर | Published: September 28, 2020 7:07 PM

1 / 11
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नाव येताच अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपली बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या व महागड्या वकीलाची नियुक्ती केली, हे वकील कोण तर सतीश मानेशिंदे.
2 / 11
सलमान खान, संजय दत्त यांची प्रकरणे लढणारे सतीश मानेशिंदे देशातील सर्वात महागडे वकील मानले जातात. अशात रिया चक्रवर्तीसारखी फारशी वलय नसलेली अभिनेत्री त्यांची फी कशी देणार? यावरून बरीच चर्चा रंगली होती. आता खुद्द सतीश मानेशिंदे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे़
3 / 11
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सतीश मानेशिंदे यावर बोलले. गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियावर मला आणि माझ्या अशीलाला फीवरून ट्रोल केले जात आहे. मुळात यावरून चर्चा अतिशय अवाजवी आणि चुकीची आहे, असे मानशिंदे म्हणाले.
4 / 11
मी रियाची केस फ्रीमध्ये लढतोय, असेही म्हटले जातेय. हे सुदधा खरे नाही. खरे तर मी माझ्या क्लाएंटकडून किती फी घ्यावी की घेऊ नये हा माझ्या व क्लाएंटमधील प्रश्न आहे, पण तरिही मला ट्रोल केले जातेय. या ट्रोल करणा-यांना ‘तुम्ही फक्त आनंदी राहा,’ एवढेच म्हणेल, असे सतीश मानेशिंदे म्हणाले.
5 / 11
रियाने हायर केलेले सतीश मानेशिंदे एक नामवंत क्रिमिनल लॉयर आहेत. बॉलिवूड सर्कलमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत.
6 / 11
रिपोर्टनुसार, 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबधित प्रकरणात त्यांनी संजय दत्तची केस सांभाळली होती.
7 / 11
संजय दत्तच नाही तर सलमान खान यालाही एका प्रकरणात त्यांनी जामीन मिळवून दिला होता. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात सलमानला जामीन मिळवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका साकारली होती.
8 / 11
रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी गंभीर आरोप करत तिच्याविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
9 / 11
सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.
10 / 11
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सुशांत केसची केवळ देशातच नाही तर देशाबाहेरील मीडियातही चर्चा होत आहे. अनेक फिल्ममेकर्स सुशांतची गर्लफ्रेन्ड रियावर सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत. तसेच रियावर एक डॉक्युमेंट्रीही तयार होणार असल्याची माहीत आहे.
11 / 11
रियाचे अनेक ड्रग्स पेडलर्ससोबतचे कनेक्शन समोर आले होते. रियावर आरोप आहे की, ती सुशांतसाठी ड्रग खरेदी करत होती. रियाने अनेकदा कोर्टात जामीन अर्ज केलाय. पण तिच्यावर आरोप इतके गंभीर आहेत की, ती तुरूंगातून बाहेर येऊ शकली नाही.
टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत