Join us  

तब्बल २ वर्षांनी सुशांतचे Unseen Photos आले समोर; फोटो पाहताच चाहत्यांचे पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 3:45 PM

1 / 9
बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे आजही त्याला विसरणं कोणालाही शक्य नाही.
2 / 9
सुशांतचं निधन झाल्यानंतर हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हा मुद्दा चर्चेत आला होता. यात त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याकडेही संशयाची सुई गेली होती.
3 / 9
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियाला तुरुंगवासही झाला असून सध्या तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
4 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रियाने सुशांतच्या आठवणीत त्याचे काही अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
5 / 9
अलिकडेच रियाने सुशांतचे असे काही फोटो शेअर केले आहेत जे नेटकऱ्यांनी कधीच पाहिले नव्हते.
6 / 9
या फोटोमध्ये सुशांत मनमुरादपणे आयुष्य जगण्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 9
'दररोज तुझी न चुकता आठवण येते', असं कॅप्शन देत रियाने हे फोटो शेअर केले आहेत.
8 / 9
बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावणारा अभिनेता म्हणून सुशांतकडे पाहिलं जात होतं.
9 / 9
सुशांतचं निधन होणं हा चाहत्यांसाठी प्रचंड मोठा धक्का होता. त्यामुळे आजही चाहते त्याच्या आठवणीत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीबॉलिवूडसेलिब्रिटी