रणवीर म्हणणार ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 12:06 IST
बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगने आता नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. स्वित्झरर्लण्ड पर्यटणाचा भारतीय ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून तो काम करणार आहे....
रणवीर म्हणणार ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’
बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगने आता नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. स्वित्झरर्लण्ड पर्यटणाचा भारतीय ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून तो काम करणार आहे.पृथ्वीतलावरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झरर्लण्डला अधिकाधिक ‘देसी’ पर्यटाकांनी भेट द्यावी म्हणून त्याने ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झरर्लण्ड में’ असे म्हटले तर तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका.स्विस सरकारने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याची निवड केली आहे. रणवीरची लोकप्रियता आणि स्टारडम पाहता तो या कामासाठी एकदम योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्या निवडीबद्दल रणवीरसुद्धा फार उत्साहित आहे.तो म्हणतो, यावर्षी मी उन्हाळ्यात स्वित्झरर्लण्डला गेलो होतो. या ट्रीपमध्ये मी स्कायडाविंग, पॅराग्लायडिंग यासारखे अनेक अॅडव्हेंचर्स केले. आता तर मी स्वित्झरर्लण्ड पर्यटणाचा अधिकृत ब्रँड अॅम्बेसिडर झालो आहे. हिवाळ्यात बर्फाच्छादित स्वित्झरर्लण्ड कसा दिसतो हे पाहण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. सेंट मॉरित्झ आणि टिट्लिस एंजलबर्गच्या बर्फाळ डोंगरावर स्कीर्इंग करणे काय धमाल असेल ना! रणवीर त्याच्या उत्साही, सदैव एनर्जेटिक आणि धडपड्या स्वभावासाठी ओळखला जातो. ‘अँडव्हेचर सोल’ त्याला म्हणता येईल. त्याच्यासारख्या साहसप्रिय पर्यटकांना स्वित्झरर्लण्ड सर्वोत्तम पर्याय आहे, असे स्वित्झरर्लण्ड पर्यटणाचे भारतीय संचालक क्लॉडिओ झेम्प म्हणाले.पुढील वर्षाच्या सुरुवातील रणवीर स्वित्झरर्लण्डला जाणार असून यावेळी तो झुरिच तलावावर वेकबोर्डिंग, ल्युसर्नच्या स्विस म्युझियम आॅफ ट्रान्सपोर्ट येथे स्की जंप, सेंट मॉरित्झला भेट देणार असून तेथील स्थानिक कला-संस्कृती जाणून घेणार.एखाद्या देशाच्या पर्यटणाचा बॉलीवूड कलाकाराने आॅफिशियल ब्रँड अॅम्बेसिडर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सिद्धार्थ मल्होत्रा न्यूझीलंडचा अॅम्बेसिडर म्हणून काम करतोय. भारतीय पर्यटाकांना आपल्या देशात बोलवण्यासाठी सध्या बॉलीवूडच्या यंग ब्रिगेडचा वापर केला जातोय.