Join us  

९ वर्षांनी लहान आहे राजपाल यादवची बायको; पाहा काय करते त्याची दुसरी पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 6:00 AM

1 / 10
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव.
2 / 10
जवळपास २० वर्षांपेक्षा जास्त काळ राजपाल यादव कलाविश्वात सक्रीय आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 10
सोशल मीडियावर सक्रीय असलेला राजपाल अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील काही घटना, घडामोडीही शेअर करत असतो.
4 / 10
सध्या सोशल मीडियावर राजपालच्या दुसऱ्या पत्नीची चर्चा रंगली आहे.
5 / 10
राजपाल यादवने करुणासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, करुणाचं निधन झाल्यावर त्याने राधासोबत दुसरं लग्न केलं.
6 / 10
राधा कलाविश्वापासून दूर असून ती बँक कॅशिअर म्हणून सुरुवातीच्या काळात काम करत होती.
7 / 10
२००२ मध्ये राजपाल आणि राधा यांची कॅनडामध्ये भेट झाली. या भेटीचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं.
8 / 10
राधा, राजपालपासून ९ वर्षांनी लहान आहे. राधा आणि राजपाल यांना दोन लेकीदेखील आहेत.
9 / 10
राजपालने १९९९ मध्ये दिल क्या करे या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.
10 / 10
राजपाल याला एकूण तीन मुली आहेत. यात ज्योती ही राजपालच्या पहिल्या पत्नीची करुणाची लेक आहे.
टॅग्स :राजपाल यादवसेलिब्रिटीसिनेमा