Join us  

खऱ्या आयुष्यातही Rajinikanth आहेत 'थलायवा'; संपत्तीचा आकडा ऐकून फिरतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 11:36 AM

1 / 9
गेल्या अनेक दशकांपासून कलाविश्वावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे रजनीकांत (Rajinikanth). तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम अशा अनेक भाषिक चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी काम केलं आहे.
2 / 9
थलायवी या नावाने खासकरुन ओळख निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवासमान मानलं जातं. आज त्याच रजनीकांत यांचा ७१ वा वाढदिवस.
3 / 9
१२ डिसेंबर १९५० मध्ये बंगलोर येथे जन्म झालेल्या रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड. विशेष म्हणजे एकेकाळी कारपेंटर, बस कंडक्टर अशा नोकऱ्या करणाऱ्या रजनीकांत यांनी कलाविश्वात पदार्पण केलं आणि आपल्या नावाचा डंका वाजवला.
4 / 9
'अपूर्वा रागंगाल' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांनी आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं. आजच्या घडीला रजनीकांत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच रजनीकांत यांची एकूण संपत्ती किती ते जाणून घेऊयात.
5 / 9
caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ३६५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
6 / 9
रजनीकांत साधारणपणे त्याच्या एका चित्रपटासाठी ५० ते ६० कोटी रुपये मानधन स्वीकारतात.
7 / 9
रजनीकांत यांचं चेन्नईमध्ये मोठं आलिशान घर असून हे घर २००२ मध्ये बांधण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, या घरासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता.
8 / 9
रजनीकांत यांना गाड्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अनेक लक्झरी गाड्या आहेत. यात Toyota Innova, Range Rover, Bently अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.
9 / 9
रजनीकांत यांना १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम मालमत्ता खरेदी करण्यात गुंतवली आहे.
टॅग्स :रजनीकांतTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी