Join us  

Poonam Pandey ने Raj Kundra वर लावले होते गंभीर आरोप, म्हणाली - माझ्या फोटो-व्हिडीओसोबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 1:04 PM

1 / 10
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध बिजनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundar) याला सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पॉर्न सिनेमे (Pornography) बनवणे आणि ते काही अॅप्सवर अपलोड करण्याचा आरोप आहे.
2 / 10
या आरोपांवर सध्या शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्रा यांच्या काहीच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. अटक झाल्यानंतर राज कुंद्रा याला ट्रोल केलं जात आहे. अशात त्याच्या आधीच्या कान्ट्रोवर्सिही समोर येत आहेत.
3 / 10
मॉडल- अभिनेत्री पूनम पांडेने गेल्यावर्षी राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाहा विरोधात बॉम्बे हायकोर्टात तक्रार दाखल केली होती.
4 / 10
पूनमने राज कुंद्राववर गंभीर आरोप लावला होता की, राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने बेकायदेशीरपणे तिचे व्हिडीओ आणि फोटोंचा वापर केला होता.
5 / 10
पूनम म्हणाली होती की, दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट पेमेंटमध्ये गडबडीमुळे संपला होता. तेच राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाहाने हे आरोप फेटाळून लावले होते. आता राज कुंद्राला अटक झाल्याने पूनमचं हे प्रकरणही चर्चेत आलं आहे.
6 / 10
मुंबई पोलिसांनी सांगितलं की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई क्राइम ब्रांचमध्ये पोर्नोग्राफिक सिनेमे बनवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत आरोप लावला होता की, हे सिनेमे बनवून अॅप्सच्या माध्यमातून अपलोड केले जातात.
7 / 10
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. यातच राज कुंद्रा याचं नाव समोर आलं. पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान समोर आलं की, राज कुंद्रा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे.
8 / 10
पोलिसांना त्याच्याविरोधात अनेक ठोस पुरावे सापडले आहेत. त्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली.
9 / 10
दरम्यान याआधी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेने महाराष्ट्र सायबर सेलला स्टेटमेंट दिलं होतं. शर्लिन चोप्रा म्हणाली होती की, तिला Adult Industry मध्ये आणणारा राज कुंद्राच आहे.
10 / 10
टॅग्स :राज कुंद्रापूनम पांडेबॉलिवूड