‘रईस‘मध्ये शाहरुख दिसणार तीन रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 21:38 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा आगामी चित्रपट रईसचा ट्रेलर नुकताचा लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात शाहरुखच्या लूकची चर्चा ...
‘रईस‘मध्ये शाहरुख दिसणार तीन रूपात
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा आगामी चित्रपट रईसचा ट्रेलर नुकताचा लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात शाहरुखच्या लूकची चर्चा होत आहे. या चित्रपटात शाहरुख तीन वेळवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रईस या चित्रपटात शाहरुख खान एका व्यवसायिकाच्या रूपात दिसणार आहे. आपल्या कामाला सुरुवात करण्यापासून ते त्या क्षेत्रातील दिग्गज अशा रुपात तो दिसेल. रईसची कॉस्च्युम डायरेक्टर शीतल शर्मा म्हणाली, रईस या चित्रपटात शाहरुख खान एका लहान गावातील सामान्य युवक ते एका मोठा व्यक्ती होण्याचा प्रवास दाखविला आहे. त्यामुळे त्याचे तीन लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘रईस’ या चित्रपटात शाहरुखच्या जीवनाचे तीन वेगवेगळे चरण आहेत. यामुळे आम्हला तो दाखविताना आम्हला हळू हळू प्रवास करावा लागला. मात्र मुळात त्याचे तीन लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख आपल्या लूकसोबत प्रयोग करू देतो. अशावेळी तो फारच सहज असतो. शीतल म्हणाली, चित्रपटाच्या सुरुवातीला १९८० च्या दशकातील स्टाईल दाखविली जाईल. यात मोठे कॉलर असलेले शर्ट असेल. सर्वकाही हलक्या रंगात असेल. मात्र कथा वाढत असतानाच कॉस्च्युमदेखील गर्द रंगाचे होत जाणार आहे. हा चित्रपटातून १९८० सालच्या गुजरातचे चित्रण करण्यात आले आहे. यात मादक पदार्थांची तस्करी करणाºया एका व्यक्तीची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटातील नायकाचा व्यवसाय एक कडक पोलीस अधिकारी ध्वस्त करतो. रईस या चित्रपटात शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दिकी व माहिरा खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रईस हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबतच हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.