1 / 9रायमा सेन बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. पण बंगाली सिनेसृष्टीतील मात्र तिचा चांगलाच दबदबा आहे. 2 / 9बॉलिवूड आणि साऊथमध्ये अपयश पदरी पडल्यावर रायमाने बंगाली चित्रपटांवरच लक्ष केंद्रित केले आणि इथे मात्र तिला अपार यश लाभलं.3 / 9रायमा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या इन्स्टा अकाऊंटला गेलात की, तिचे बोल्ड, टॉपलेस फोटो लक्ष वेधून घेतात.4 / 9या बोल्ड फोटोंमुळे रायमा अनेकदा ट्रोलही होते. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी रायमा टॉपलेस फोटोशूट करते, अशी खिल्ली ट्रोलर्स उडवतात. 5 / 9आता या ट्रोलर्सला रायमाने उत्तर दिले आहे. एका ताज्या मुलाखतीत तिने टॉपलेस व बोल्ड फोटोशूट करण्यामागचे कारण सांगितले.6 / 9लोक काय म्हणतील याची मला अजिबात चिंता नाही. मी इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट करते आणि ते बिनधास्तपणे शेअर करते. लोक काय म्हणतात याने मला काहीही फरक पडत नाही, असे ती म्हणाली.7 / 9 बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मी असे बोल्ड फोटोशूट करतात, असे काही म्हणतात. पण खरे सांगायचे तर मला तसे शूट करायला आवडते. स्वत:ला विविध रुपांमध्ये पाहण्याची मजा काही औरच आहे. ही मजा मुर्ख ट्रोलर्सला कळणार नाही,असे ती म्हणाली.8 / 9रायमा सेनने दमन, परिणीता, तीन पत्ती, बॉलिवूड डायरिज अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत.9 / 9 अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला.