प्रेग्नंसीवेळी निर्मात्याकडून आला वाईट अनुभव; राधिका आपटे म्हणाली, "डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:23 IST
1 / 10मराठी, हिंदी आणि हॉलिवूड सिनेमांमध्येही भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आई झाली आहे. आठ महिन्यांपूर्वीच तिने गोंडस मुलीला जन्म दिला.2 / 10राधिकाने काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रेग्नंसीतील अडचणी, पोस्टपार्टम डिप्रेशन यावर भाष्य केलं होतं. तसंच लेकीच्या जन्मानंतर काही दिवसातच तिने पुन्हा कामही सुरु केलं.3 / 10दरम्यान राधिकाला जेव्हा ती गरोदर असल्याचं कळलं तेव्हा तिला दिग्दर्शक,निर्मात्यांकडून वाईट अनुभव आला होता. याबद्दल नुकतंच तिने नेहा धुपियासोबत झालेल्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं.4 / 10राधिका म्हणाली, 'माझी प्रेग्नंसी प्लॅन केलेली नव्हती. त्यामुळे पहिले तीन महिने तर माझी आधीच ठरलेली काम लाईन अप होती. पहिले तीन महिने जे अगदीच कठीण असतात त्या काळात मी ४०-४५ डिग्रीमध्ये काम करत होते.'5 / 10'४ दिवसांची गरोदर असतानाच सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांना मी प्रेग्नंट आहे असं सांगितलं. तेव्हा भारतातील एक निर्माता माझ्या प्रेग्नंसीची बातमी ऐकून नाराज झाला होता. तर दुसरा एक फॉरेन प्रोजेक्ट होता त्यांनी उलट मला खूप पाठिंबा दिला.'6 / 10'मी थायलंडमध्ये शूट करत होते. मला थाय फूड खावं लागणार होतं. मला मीट, फिश या सगळ्याकडे बघवतही नव्हतं. मी पास्ता, भात हे खात होते. माझं पहिल्याच महिन्यात खूप वजन वाढलं होतं.'7 / 10'मी सतत खायचे. त्या प्रोजेक्टच्या दिग्दर्शकाला यामुळे काहीच अडचण नव्हती. तू प्रेग्नंट आहेस आणि खूप सुंदर दिसत आहे. तुला हवं ते कर असं तो म्हणाला. त्याने मला खूप पाठिंबा दिला.'8 / 10'मात्र भारतातील प्रोजेक्टमध्ये खूप एक्स्ट्रा शेड्युल होतं. त्याचा निर्माता म्हणाला की आपल्याला हे करावंच लागेल. तेव्हा मी म्हटलं की पण आता तुम्हाला माझ्या शेड्युलनुसार करावं लागेल.'9 / 10'मला त्या प्रोजेक्टमध्ये खूप घट्ट कपडे घालावे लागणार होते. तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की एखाद्या सीनमध्ये मी एवढे घट्ट कपडे नाही घातले तरी काही अडचण येणार नाही. मला पहिल्या तीन महिन्यात खूप ब्लोटिंग झालं होतं. मी त्या घट्ट कपड्यात फिट होऊच शकत नव्हते. तरी मला ते करावं लागलं.'10 / 10'एके दिवशी मला सेटवरच ओटीपोटात खूप दुखायला लागलं. मला डॉक्टरकडे जावं लागणार होतं. काही धोका तर नाही ना याची मला खात्री करायची होती. पण त्या निर्मात्याने मला दिवसभर सेटवरच बसवलं. मला डॉक्टरकडे जाऊच दिलं नाही.'