1 / 10बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिच्या सोशल मीडिया पोस्ट. होय, सध्या पीसीने एकापाठोपाठ एक पोस्ट करण्याचा धडाका लावला आणि यानंतर काय तर प्रियंकांच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात.2 / 10प्रियकांने तिच्या बालपणापासून ते मिस वर्ल्डपर्यंतचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केलेत आणि यासोबत ‘अनफिनिश्ड’ अर्थात ‘अपूर्ण’ असे कॅप्शन दिले.3 / 10हे ‘अनफिनिश्ड’ कॅप्शन पाहून अनेकांनी प्रियंका लवकरच गुड न्यूज देणार असल्याचा अंदाज बांधला.4 / 10प्रियंका प्रेग्नंट आहे, या बातमीने तुम्ही आनंदीत झाले असाल तर जरा थांबा... कारण ‘अनफिनिश्ड’ हे कॅप्शन आणि प्रियंकाच्या प्रेग्नंसीचा काही एक संबंध नाही. तर ‘अनफिनिश्ड’ हे प्रियंकाच्या बायोग्राफीचे नाव आहे.5 / 10लॉकडाऊनदरम्यान प्रियंकाने बायोग्राफीवर काम सुरू केले होते. या पुस्तकाचे शीर्षक ‘अनफिनिश्ड’ असणार आहे.6 / 10या पुस्तकात प्रियंकांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास चाहत्यांना वाचायला मिळणार आहे.7 / 10याच बायोग्राफीच्या अनुषंगाने प्रियंकाने अनेक जुन्या आठवणी ताज्या करत, जुने फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.8 / 10बॉलिवूडच्या देसी गर्ल आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी प्रियंकाने बराच संघर्ष केला. 9 / 102000 मध्ये तिने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आणि प्रियंका बॉलिवूडमध्ये आली. आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. हॉलिवूडमध्येही तिचा दबदबा आहे. 10 / 102018 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. सध्या प्रियंका पर्सनल लाईफसोबत प्रोफेशनल लाईफ एन्जॉय करतेय.