Join us

प्रियंका आणि परिणिती चोपडाप्रमाणेच स्टायलिश आहे त्यांची चुलत बहीण, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

चोपडा परिवारातील अभिनेत्री प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करीत असताना स्वत:चा ठसा उमटविला आहे, तर दुसरीकडे परिणिती चोपडाही बॉलिवूडमध्ये आगेकूच करीत आहे. आता या चोपडा भगिनींची आणखी एक बहीण सध्या तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चर्चेत आली आहे. होय, प्रियंका आणि परिणितीची चुलत बहीण मीरा चोपडा सध्या सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू दाखवित आहे की, तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

चोपडा परिवारातील अभिनेत्री प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करीत असताना स्वत:चा ठसा उमटविला आहे, तर दुसरीकडे परिणिती चोपडाही बॉलिवूडमध्ये आगेकूच करीत आहे. आता या चोपडा भगिनींची आणखी एक बहीण सध्या तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चर्चेत आली आहे. होय, प्रियंका आणि परिणितीची चुलत बहीण मीरा चोपडा सध्या सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू दाखवित आहे की, तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. मीरा चोपडा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, ती नियमितपणे तिचे फोटोज् अपलोड करीत असते.मीरा चोपडाला नीला नावानेही ओळखले जाते.मीरा तिच्या बहिणींप्रमाणेच खूप हॉट आणि स्टायलिश आहे.मीरा तामिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने २००५ मध्ये Anbe Aaruyire या तामिळ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर २०१६ मध्ये तिने विक्रम भट्ट यांच्या ‘१९२० : लंडन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.