Join us  

Piyush Jain Kanpur raid: इन्कम टॅक्सने कसे शोधले कानपूरमधील अत्तर व्यापाऱ्याच्या घरातील घबाड? चित्रपटातून समोर येणार संपूर्ण कहाणी, नाव असेल रेड-२

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 5:04 PM

1 / 5
उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यावसायित पीयूष जैन यांच्या निवसस्थानी छापा टाकून प्राप्तिकर विभागाने कोट्यवधीच्या रोख रकमेसह सोनेनाणे आणि अन्य उंची वस्तू जप्त केल्या होत्या. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने केलेली ही कारवाई आता चंदेरी पडद्यावर दिसणार आहे.
2 / 5
या कारवाईवर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव रेड-२ असेल.
3 / 5
निर्माता कुमार मंगत पाठक यांनीच रेड या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सांगितले की, रेड चित्रपटामध्ये आम्ही भिंतीमधूनही पैसे बाहेर पडू शकतात, हे दाखवले होते. मात्र हल्लीच कानपूर आणि कन्नौजमधील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमधून असा प्रकार प्रत्यक्षात समोर आला आहे. हे पाहूनच मी रेड-२ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये भिंतीमधून पैसे सापडतानाचे चित्र दाखवले जाईल.
4 / 5
कुमार मंगत पाठक यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या रेड चित्रपटामध्ये अजय देवगण याने एका प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका वठवली होती. तो प्राप्तिकर विभागाचा एक अधिकारी म्हणून एका राजकीय नेत्याच्या घरावर धाड टाकताना या चित्रपटात दिसला होता. मात्र रेड-२ चित्रपटामध्ये अजय देवगन असणार की नाही, हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.
5 / 5
प्राप्तिकर विभागासह इतर विभागांनी काही दिवसांपूर्वी कानपूरमधील अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. त्या छाप्यामध्ये सुमारे १९७ कोटींची रोख रक्कम, २५ किलो सोने आणि २५० किलो चांदी जप्त करण्यात आली होती. सध्या पीयूष जैन हा न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच डीआरआनेही कस्टम अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
टॅग्स :इन्कम टॅक्सब्लॅक मनीबॉलिवूडधाड