Join us  

Pics : चेह-यावर मास्क घालून ‘सिम्बा’चा लेट नाईट शो पाहायला पोहोचला रणवीर सिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 1:35 PM

1 / 4
रणवीर सिंगचा अ‍ॅक्शन ड्रामा ‘सिम्बा’ बॉक्सआॅफिसवर धूम करत आहेत. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. साहजिकचं ‘सिम्बा’च्या या यशाने रणवीर सध्या जाम खूश आहे. ‘सिम्बा’च्या रिलीजच्या पहिल्या दिवशी चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रणवीर सिंग चित्रपटगृहात पोहोचला होता. रिलीजच्या एक आठवड्यानंतर तो पुन्हा चित्रपटगृहात पोहोचला. अर्थात चेहरा लपवत...
2 / 4
रिलीजच्या दहाव्या दिवशी रणवीरने चाहत्यांसोबत ‘सिम्बा’ पाहिला. पण त्याचे गेटअप पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. कालच रणवीर पत्नी दीपिका पादुकोणसोबत मुंबईत आला. यानंतर तो ‘सिम्बा’चा लेट नाईट शो बघायला पोहोचला.
3 / 4
यावेळी रणवीरने काळ्या मास्कने चेहरा झाकला होता. या गेटअपमध्ये फार कमी लोकांनी त्याला ओळखले. पण मीडियाने मात्र याठिकाणीही त्याला ओळखले.
4 / 4
लवकरच रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला रणवीरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
टॅग्स :रणवीर सिंगसिम्बा