Join us  

अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे पंकज त्रिपाठीची लेक; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:09 PM

1 / 10
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी.
2 / 10
मिर्झापूर, सेक्रेड गेम यांसारख्या वेबसीरिजमधून ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.
3 / 10
पंकज त्रिपाठी यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहेत.
4 / 10
पंकज त्रिपाठी यांच्या लेकीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
5 / 10
IIFA 2022 मध्ये पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी यांची लेक कॅमेरासमोर आली आणि तेव्हापासून ती चर्चेत आली.
6 / 10
पंकज त्रिपाठी यांच्या लेकीचं नाव आशी असं असून ती १७ वर्षांची आहे.
7 / 10
आशी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. परंतु, पंकज यांची पत्नी मृदुला कायम त्यांच्या लेकीचे फोटो शेअर करत असते.
8 / 10
आशी दिसायला प्रचंड सुंदर असून अनेक जण ती बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार असा प्रश्न विचारतात.
9 / 10
आशी आई-वडिलांपासून दूर बोर्डिंगमध्ये राहते.
10 / 10
काही काळापूर्वीच पंकज यांनी 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना 'आशी लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे', असं त्यांनी सांगितलं.
टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमावेबसीरिज