Join us  

IN PICS: अब काम मुझे ढूंढता हैं...! ‘कालिन भैय्या’ विसरला नाही ‘ते’ दिवस

By रूपाली मुधोळकर | Published: October 23, 2020 1:06 PM

1 / 10
बॉलिवूडमध्ये सध्या कोणाची डिमांड आहे तर पंकज त्रिपाठीची. ‘मिर्झापूर 2’ ही वेबसीरिज रिलीज होता ‘कालिन भैय्या’ पुन्हा चर्चेत आला आहे.
2 / 10
कधी काळी पंकज त्रिपाठी नावाचा हाच अभिनेता निर्मात्यांचे उंबरठे झिजवायचा. दिवसरात्र भटकत काम शोधायचा. आज मात्र काम त्यांना शोधत येते.
3 / 10
पंकज त्रिपाठीचे बालपण बिहारमधील एका छोट्याशा गावात गेले आहे. वडिल शेतकरी, घरची परिस्थिती बेताची. अशापरिस्थितीत पंकज त्रिपाठीला अ‍ॅक्टिंगच्या वेडाने झपाटले. या वेडापायी तो गावातील नाटकांमध्ये मुलीची भूमिका साकारू लागला. या भूमिका साकारता साकारताला गावातील काहीजणांनी त्याला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला आणि त्याने गाव सोडून पाटण्याला जाण्याचे ठरवले.
4 / 10
कॉलेजात असताना त्याने अनेक नाटकांत काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सक्रिय कार्यकर्ता झाला. मात्र पाहिजे तसे यश नाही म्हटल्यावर निराश झाला. मग काय अभिनय आणि राजकारण दोन्ही सोडून काही वर्षं हॉटेलमध्ये नोकरी केली.
5 / 10
अर्थात त्यानंर तो पुन्हा अभिनयाकडे वळला. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो कामाच्या शोधात मुंबईत आला. नशीबाने ‘रण’ या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली.
6 / 10
पण त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा होता. यानंतर ऑडिशनसाठी दिवसरात्र भटकंती सुरु झाली. निर्माते-दिग्दर्शकांच्या आॅफिसात काम मागण्यासाठी तासन् तास ताटकळत बसण्याची वेळ आली. आज याच पंकज त्रिपाठी भेटण्यासाठी वेळ घ्यावा लागतो.
7 / 10
‘रण; या चित्रपटानंतर अपहरण, ओमकारा, धर्म यांसारख्या अनेक चित्रपटात छोट्याशा भूमिका साकारल्या. आठ वर्षांनी त्याला ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याचे नशीब फळफळले.
8 / 10
‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी त्याचे ऑडिशन जवळजवळ आठ तास सुरू होते. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
9 / 10
न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांचे तर प्रचंड कौतुक करण्यात आले.
10 / 10
पंकजने आज पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवले आहे. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या या मुलाने आता मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. पण आजही तो गावातील घर विसरू शकलेला नाही. एकदा इतका जोराचा पाऊस आला होता की, त्या घराचे छप्परच उडून गेले होते आणि विना छप्पर त्याने रात्र घालवली होती.
टॅग्स :पंकज त्रिपाठीमिर्झापूर वेबसीरिज