Join us  

पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; न्यूयॉर्कमध्ये राहणारी अनुजा ठरतीये ओटीटी क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 3:10 PM

1 / 12
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये पल्लवीने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
2 / 12
राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरलेल्या पल्लवीने लहान असतानाच अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
3 / 12
१९८० ते १९९० या काळात पल्लवीने रुक्मावती की हवेली,सूरज का सातवां घोड़ा, त्रिशग्नि, सौदागर, तहलका आणि मुजरिम अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे पल्लवी साऱ्यांनाच ठावूक आहे.
4 / 12
अभिनयामुळे चर्चेत येणारी पल्लवी यावेळी तिच्या भाचीमुळे चर्चेत येत आहे.
5 / 12
पल्लवीचा भाऊ अलंकार जोशी न्यूयॉर्कमध्ये राहात असून ते प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांच्याच लेकीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
6 / 12
पल्लवीच्या भाचीचं नाव अनुजा जोशी असं असून तिने न्यूयॉर्कमधूनच तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
7 / 12
अनुजाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. त्यानंतर ती काही वेबसीरिजमध्ये झळकली.
8 / 12
हॅलो मिनी या वेब सीरिजमध्ये अनुजाने मुख्य भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सीरिजमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
9 / 12
हॅलो मिनी व्यतिरिक्त ती ब्रोकन बट ब्युटीफूलमध्येही झळकली आहे.
10 / 12
सध्या अनुजा तिच्या वेबसीरिजमुळे चर्चेत येत असून ओटीटीवर ती विशेष लोकप्रिय आहे.
11 / 12
अनुजाने अलिकडेच UK स्थित अंकुर राठीसोबत लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
12 / 12
अनुजाचा जन्म अमेरिकेमध्ये झाला असून तेथेच ती लहानाची मोठी झाली आहे. तसंच तिला अनिषा ही बहीण आणि एक भाऊदेखील आहे.
टॅग्स :पल्लवी जोशीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन