Join us

‘पद्मावती’चा ट्रेलर चित्ररूपात...खास तुमच्यासाठी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर पाहून हा चित्रपट किती भव्य असेल, याची कल्पना येते. हाच ट्रेलर चित्ररूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर पाहून हा चित्रपट किती भव्य असेल, याची कल्पना येते. हाच ट्रेलर चित्ररूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण हिचा लूक चाहत्यांना मोहित करणारा आहे. ट्रेलरमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसते आहे.राजस्थानी पेहराव आणि राजस्थानी दागिण्यांत सजलेली दीपिका भूमिकेत अगदी फिट बसली, असेच म्हणायला हवे.राजा रावल रतनसिंहच्या भूमिकेत शाहिद कपूरही अगदी जमून आलाय. शाहिद व दीपिकाची जोडी पाहणे इंटरेस्टिंग आहे.सिंहासनावर असलेला राजा रावल सिंह म्हणजेच शाहिदचा हा फोटो त्याच्या चाहत्यांसाठी दिवाळीची भेट म्हणता येईल.दीपिका पादुकोण व शाहिद कपूर या दोघांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. अलाऊद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारणारा रणवीर सिंग तर तुम्ही पाहायलाच हवा.‘पद्मावती’चा हा भव्यदिव्य सेटही डोळ्यांची पारणे फेडणारा आहे.ं