Join us  

Urvashi Rautela: पंतच नाही तर क्रिकेटपटू, अभिनेत्यांसह अंबानींच्या लेकालाही उर्वशीनं केलंय डेट, यादी आहे मोठी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 3:10 PM

1 / 6
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची तिच्या अभिनयासाठी जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा तिने निर्माण केलेल्या वादांची होत असते. २०२२ मध्ये तर तिने मिस्टर आरपी, मिस्टर आरपी म्हणत वर्षभर धुमाकूळ घातला होता. ती आणि रिषभ पंत रिलेशनशिपमध्ये असल्याचीही चर्चा झाली होती. मात्र उर्वशीने केवळ रिषभ पंतच नाही तर अनेकांना डेट केलं आहे. तिची डेटिंग लिस्ट खूप मोठी आहे.
2 / 6
उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मिस्टर आरपी तिची हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होता. या दरम्यान, मला किमान १७ मिस कॉल्स आले. दरम्यान, नंतरच्या काळाता रिषभ पंत जिथे जायचा तिथे उर्वशी रौतेला पोहोचायची.
3 / 6
२०१८ मध्ये आयपीएलदरम्यान उर्वशी रौतेलाची भेट हार्दिक पांड्याशी झाली. दोघेही कथितपणे एकमेकांना डेट करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, अचानक हार्दिक पांड्याने नताशा हिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी आली.
4 / 6
२०१५ मध्ये तर उर्वशी रौतेलाचं नाव आकाश अंबानीसोबत जोडलं गेलं होतं. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. मात्र एकेदिवशी आकाश अंबानीने श्लोका हिच्याशी विवाह केला. या नात्याचीही अखेर झाली.
5 / 6
चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे याच्यासोबतही उर्वशी रौतेला डिनर डेटपासून पार्टीमध्येही जात होती. दोघेही एवढ्या वेळा एकत्र दिसले की, त्यांचं अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या दोघांनीही ही गोष्ट कधीही मान्य केली नाही. तसेच कधी नाकारलीही नाही. या नात्याचीही आधीप्रमाणेच अखेर झाली.
6 / 6
मिस्टर आरपी मुळे उर्वशी एवढी ट्रोल झाली की, अखेरीस तिने तो मिस्टर आरपी कोण हेही सांगितले. राम पोथिनेन्नीसोबत उर्फीने फोटो शेअर केला. त्यानंतर उर्वशीने रिषभ भैयासाठी सवत आणल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. दरम्यान, हे दोघेही चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट झाले.
टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतसेलिब्रिटीबॉलिवूड