Join us  

PHOTOS: जाणून घ्या कोण आहे रोहनप्रीत सिंग ?, ज्याच्यासोबत लग्न करणार आहे नेहा कक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 1:51 PM

1 / 7
बॉलिवूडची लोकप्रिय सिंगर नेहा कक्करने अखेर प्रेमाची जाहिर कबुली दिलीच. होय, रोहनप्रीतवरचे प्रेम तिने कबुल केले. (Photo Instagram)
2 / 7
मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यात 24 ऑक्टोबरला दिल्लीत नेहा रोहनप्रीतसोबत लग्नाच्याबेडीत अडकणार आहे. (Photo Instagram)
3 / 7
नेहा कक्कर लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Photo Instagram)
4 / 7
व्हायरल झालेला फोटो बघून नेहाचा रोका झाला असा अंदाज तिचे फॅन्स लावतायेत. (Photo Instagram)
5 / 7
आता नेहाचा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. (Photo Instagram)
6 / 7
या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. (Photo Instagram)
7 / 7
नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. (Photo Instagram)
टॅग्स :नेहा कक्कर