Muhurat of Marathi film Hrudayan to be directed by Vikram Phadnis
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 16:54 IST
ह्रदयांतर या चित्रपटाच्या माध्यमातून फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. विक्रम दिग्दर्शित करत असलेल्या ह्रदयांतर या चित्रपटाच्या मुहूर्ताला बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान उपस्थित होता. शाहरुखसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती.
Muhurat of Marathi film Hrudayan to be directed by Vikram Phadnis
ह्रदयांतर या चित्रपटाच्या माध्यमातून फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. विक्रम दिग्दर्शित करत असलेल्या ह्रदयांतर या चित्रपटाच्या मुहूर्ताला बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान उपस्थित होता. शाहरुखसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती. मुहूर्ताच्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विक्रमला शुभेच्छा देण्यासाठी मलायका अरोरा आली होती. अभिनेता अर्जुन कपूरही मुहु्र्ताच्या ठिकाणी आपल्या कूलअंदाजात उपस्थित होता. अरबाज खानही याठिकाणी हजेरी लावली. विक्रमला त्याच्या नवी इंनिगसाठी शुभेच्छा द्यायला अथियाही आली होती. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मुहुर्ताच्यावेळी मुक्ता बर्वे आणि सोनाली खरे उपस्थित होत्या.