Join us  

IN PICS : नाईट क्लबमध्ये भेट, प्रेम, लग्न अन् घटस्फोट... ; अशी होती मिनिषा-रेहानची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 2:04 PM

1 / 11
गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा अचानक चर्चेत आली आहे. होय, मिनिषाचा घटस्फोट झालाय.
2 / 11
घटस्फोट झाल्याचे आत्ता कुठे मिनिषाने कन्फर्म केले आहे. गेल्या 2 वर्षांपासून मिनिषा तिचा पती रायन थामपासून वेगळी राहत होती. मात्र तिने याबद्दल कुठलाही खुलासा केला नव्हता.
3 / 11
6 जुलै 2015 रोजी मिनिषा व रायन लग्नबंधनात अडकले होते. लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा कुठे मिनिषाने लग्न केल्याचे लोकांना कळले होते.
4 / 11
2018 मध्ये मिनिषा व रायन यांच्यात बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. मिनिषा पतीपासून वेगळी राहत असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र मिनिषाने यावर बोलणे टाळले होते. मात्र आत्ताकुठे तिने तिचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले आहे.
5 / 11
मिनिषा व रायनची भेट मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. 2013 मध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोन वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते.
6 / 11
2015 मध्ये त्यांनी लग्न केले होते. रेयानचे स्वत:चे हॉटेल आहे आणि तो पूजा बेदीचा कझिन आहे. मात्र आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत.
7 / 11
2005 साली मिनिषाने सुजीत सरकारचा ‘यहां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
8 / 11
त्यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड आणि दस कहानियां सारख्या सिनेमांतही ती झळकली. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचना ए हसीनों’ सिनेमाने.
9 / 11
2017 मध्ये प्रदर्शित भूमी हा तिचा अखेरचा सिनेमात ती झळकली. यानंतर तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.
10 / 11
मिनिषाने फेशिअल सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला होता. प्लास्टीक सर्जरी करण्यापूर्वीचा तिचा सिनेमातला लूक आणि त्यानंतरचा लूकमध्ये पाहून अनेकांना धक्का बसला होता.
11 / 11
यानंतरच्या काळात मिनिषाला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाल्या. मिनिषा सिनेसृष्टीपासून कधी दुरावली हे तिलाच कळाले नाही.
टॅग्स :मिनिषा लांबा