Join us  

SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 1:25 PM

1 / 10
दीपिका पादुकोणचा फॅशन सेन्स चांगला आहे, यात काहीही वाद नाही. दीपिकाचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो.
2 / 10
अनेकदा दीपिकाला हॉलिवूडमधील अभिनेत्रीची कॉपी केल्याचा सहन करावा लागला. अगदी काइली जेनरच्या लूकपासून तर पोतुर्गालमधील मॉडेल सारा संपोआच्या स्टाईलची कॉपी केल्याचा आरोप तिच्यावर झाला. मग काय नेटक-यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. किती कॉपी करणार, आत्ता तरी थांबव, अशा काय काय कमेंट तिला ऐकाव्या लागल्या.
3 / 10
काईलीची एकदा नाही तर अनेकदा दीपिकाने कॉपी केली. बिग बॉसच्या प्रीमिअरदरम्यान दीपिकाने काईलीने कधीकाळी घातलेल्या ड्रेसची कॉपी केली होती.
4 / 10
या वर्षीच्या सुरुवातीला दीपिकाने नायका फेमिना ब्युटी अवार्ड्स 2020 सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी दीपिका कॅरी केलेल्या मोनोक्रोमॅटिक बोल्ड स्ट्रॅपलेस गाऊनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पण तिचा हा आऊटफिट पाहून नेटक-यांनी दीपिकाला ट्रोल करणे सुरु केले. कारण काय तर दीपिकाचा लूक पाहून नेटक-यांना काइली जेनरची आठवण झाली.
5 / 10
40 व्या एमी अवार्ड सोहळ्यात हॉलिवूड अभिनेद्धी जुली मेरी बर्मनने हा ड्रेस घातला होता. पुढे दीपिकाने तिच्या आऊटफिटची कॉपी केली होती.
6 / 10
2012 साली हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज हा सुपर क्लासी शिमरी ड्रेस कॅरी केला होता. पुढे दीपिका त्याची कॉपी करताना दिसली.
7 / 10
एशले बेन्सन आणि दीपिकाचा हा ड्रेस पाहा. दीपिकाला कॉपी कॅट का म्हटले जाते, ते यावरून तुमच्या लक्षात येईन.
8 / 10
59 व्या फिल्मफेअर अवार्डमध्ये दीपिकाचा गोल्डन शिमरी ड्रेस घालून पोहोचली होती. तिचा हा ड्रेस हॉलिवूड मॉडेल लेडी व्हिक्टोरिया हार्वेचा कॉपी होता. रंग तेवढाच काय तो वेगळा होता.
9 / 10
दीपिकाने केवळ हॉलिवूड बालांची कॉपी केली असे नाही तर अगदी करिना कपूरची कॉपी करतानाही तिला लोकांनी पकडले आहे.
10 / 10
करिनाने एका अवार्ड शोसाठी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली न्यूड शेड साडी निवडली होती. यानंतर आयपीएलशी संबंधित एका इव्हेंटसाठी दीपिकाने अगदी हीच साडी निवडली होती.
टॅग्स :दीपिका पादुकोण