Join us

कधीकाळी अशी दिसायची मल्लिका शेरावत; पहा तिचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने वयाचे ४० वर्षे पूर्ण केले आहेत. २४ आॅक्टोबर १९७६ मध्ये हरियाणा येथे एका जाट परिवारात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असे आहे. बॉलिवूडमध्ये तिने मल्लिका हे नाव धारण केले, तर शेरावत हे तिच्या आईचे सरनेम आहे. खरं तर मल्लिकाला नेहमीच आईचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच तिने आईचे अडनाव तिच्या नावासमोर लावले आहे. असे म्हटले जाते की, मल्लिकाचे वडील तिच्या अभिनेत्री बनण्याच्या निर्णयावर नाराज होते. मात्र आता त्यांच्यातील नाते सामान्य आहे. मल्लिकाच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा हा खास फोटो वृत्तांत...

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने वयाचे ४० वर्षे पूर्ण केले आहेत. २४ आॅक्टोबर १९७६ मध्ये हरियाणा येथे एका जाट परिवारात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असे आहे. बॉलिवूडमध्ये तिने मल्लिका हे नाव धारण केले, तर शेरावत हे तिच्या आईचे सरनेम आहे. खरं तर मल्लिकाला नेहमीच आईचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच तिने आईचे अडनाव तिच्या नावासमोर लावले आहे. असे म्हटले जाते की, मल्लिकाचे वडील तिच्या अभिनेत्री बनण्याच्या निर्णयावर नाराज होते. मात्र आता त्यांच्यातील नाते सामान्य आहे. मल्लिकाच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा हा खास फोटो वृत्तांत...मल्लिका असे सांगतेय की, ती सिंगल आहे. परंतु असे म्हटले जाते की, तिचे २००० सालातच पायलट करण सिंग गिल यांच्याशी लग्न झाले. तिचे हे लग्न जवळपास एक वर्ष टिकले.मल्लिकाने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हरियाणातून थेट मुंबईमध्ये बस्तान ठोकले. असेही म्हटले जाते की, मल्लिकाला एक मुलगा आहे. परंतु याबाबतचा सबळ असा कुठलाही पुरावा नाही.मल्लिका शेरावत चित्रपटांमध्ये येण्याअगोदर एयर हॉस्टेस म्हणून काम करीत होती. मात्र मल्लिका सांगतेय की, चित्रपटात येण्याअगोदर मी कुठेच काम केले नाही.मल्लिकाने बॉलिवूडमध्ये करिना कपूर आणि तुषार कपूर स्टारर ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटात तिने रिमा लांबा नावाची भूमिका साकारली.मल्लिकाला २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. चित्रपटात तिने इमरान हाशमीसोबत खूपच बोल्ड सीन्स दिले होते.मल्लिकाने ‘शादी से पहले, वेलकम, डबल धमाल, डर्टी पॉलिटिक्स आदी चित्रपटांमध्ये काम केले.मल्लिका सध्या बॉयफ्रेंड सायरस आॅक्सफेनसोबत राहते.