मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST
बॉलिवूड अभिनेत्री मलाइका आरोरा हिला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. मलाइकाचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांना आपल्या फिजिक आणि फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. नुकतेच मलाइकाने ‘द पिककॉक’ या साप्ताहिकासाठी फोटोशूट केले. मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये मलाइका खूपच वेगळ्या आणि बिंधास्त अंदाजात बघावयास मिळत आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् मलाइकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.
मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री मलाइका आरोरा हिला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. मलाइकाचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांना आपल्या फिजिक आणि फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. नुकतेच मलाइकाने ‘द पिककॉक’ या साप्ताहिकासाठी फोटोशूट केले. मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये मलाइका खूपच वेगळ्या आणि बिंधास्त अंदाजात बघावयास मिळत आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् मलाइकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. मोकळे केस आणि लाल रंगाची लिपस्टिकसह मलाइका खूपच बिंधास्त लूकमध्ये बघावयास मिळत आहे. मलाइकाने छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, माही वे, काल, धमाल यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मलाइकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. १८ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये बघावयास मिळत असलेली मलाइका निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. एका फोटोमध्ये मलाइकाने गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला आहे.