1 / 8२००२ साली प्रदर्शित झालेला 'मकडी' सिनेमा हा बॉलिवूडमधील गाजलेला हॉरर चित्रपट. ९०च्या दशकातील मुलांच्या आजही हा सिनेमा चांगलाच लक्षात असेल. 2 / 8या सिनेमात छोट्या मुन्नी आणि चुन्नी या दोन बहिणींनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिने 'मकडी'मध्ये मुन्नी आणि चुन्नी अशी दुहेरी भूमिका साकारली होती. 3 / 8श्वेताने साकारलेली मुन्नी-चुन्नीची भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पण, ही छोटी मुन्नी आता मात्र मोठी झाली आहे. 4 / 8आता श्वेताला ओळखणंही कठीण झालं आहे. 'मकडी'मधली छोटी मुन्नी आता ग्लॅमरस झाली आहे. 5 / 8श्वेताने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तिने अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 6 / 8क्रिमिनल जस्टिस ४ मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शुक्राणू, बद्रि की दुल्हनिया, लाइफ हो तो ऐसी अशा सिनेमांमध्ये ती झळकली. 7 / 8करिश्मा का करिश्मा, कहानी घर घर की या मालिकांमध्येही श्वेता दिसली होती. 8 / 8श्वेताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा श्वेता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.