Join us

‘मै नही तो कौन बे’ फेम सृष्टी तावडेचा मोलकरणीने केला शारीरिक छळ; बऱ्याच वर्षांनी सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:35 IST

1 / 11
'हसल' या शोमुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली रॅपर म्हणजे सृष्टी तावडे. तिचं मैं नहीं तो कौन बे हे रॅप तुफान गाजलं.
2 / 11
सृष्टीने केलेलं रॅप सोशल मीडियावर तुफान गाजलं. इतकंच नाही तर सेलिब्रिटींनाही ते भलतच भावलं.
3 / 11
आपल्या रॅपमुळे आणि हटके स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत येणाऱ्या सृष्टीने यावेळी धक्कादायक खुलासा केला आहे.
4 / 11
अलिकडेच सृष्टीने ‘इंडिया टुडे एन्क्लेव्ह’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने लहान असताना तिच्यावर झालेल्या शारीरिक छळाविषयी भाष्य केलं.
5 / 11
वयाच्या चौथ्या वर्षी घरातील मोलकरणीने मला प्रचंड मारहाण केल्याचं तिने यावेळी सांगितलं.
6 / 11
'माझे आई-वडील जेव्हा ऑफिसला जायचे त्यावेळी आमच्या घरात एक माणूस गुपचूप यायचा. परंतु, आमच्या मोलकरणीसाठी आणि त्याच्यासाठी मी अडचण असायचे. त्यामुळे मला गप्प करण्यासाठी ती मला खूप मारायची. इतकंच नाही तर आईला काहीही सांगायचं नाही अशी धमकीही ती द्यायची', असं सृष्टी म्हणाली.
7 / 11
पुढे ती म्हणते, 'आमच्या घरात एक नवीन मोलकरीण आली होती. ती एका माणसासोबत रिलेशनमध्ये होती. ही गोष्ट मला माहित होती. परंतु, ही बाब मी माझ्या आई-वडिलांना सांगेन या भीतीने ती मला मारायची. जवळपास ३ वर्ष तिने मला असंच रोज मारलं. घरात सापडेल त्या सामानाने ती मला मारायची. या गोष्टीचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला.'
8 / 11
सृष्टी मूळची मुंबईची असून तिची लोकप्रियता कमालीची आहे.
9 / 11
इन्स्टाग्रामवर तिचे १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
10 / 11
'मैं नही तो कौन' या रॅप साँग शिवाय 'चिल किंडा', 'भगवान बोल रहा हूं', 'मेरा बचपन कहां' सारखी अनेक रॅप साँग तिनं गायली आहेत.
11 / 11
सृष्टीचं युट्यूब चॅनेलदेखील आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन