पाहा या अभिनेत्रींचे हे worst ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 19:10 IST
अभिनेत्री म्हंटल्यावर आपल्या डोळ््यांसमोर नक्कीच छान कपडे परिधान केलेल्या हिरोईन्स येतात. चित्रपटांमध्ये, कार्यक्रमांत, पुरस्कार सोहळ््यांमध्ये नेहमीच अगदी गॉर्जिअर लुकमध्ये ...
पाहा या अभिनेत्रींचे हे worst ड्रेस
अभिनेत्री म्हंटल्यावर आपल्या डोळ््यांसमोर नक्कीच छान कपडे परिधान केलेल्या हिरोईन्स येतात. चित्रपटांमध्ये, कार्यक्रमांत, पुरस्कार सोहळ््यांमध्ये नेहमीच अगदी गॉर्जिअर लुकमध्ये दिसणाºया या अभिनेत्री कधीतरी वाईट ड्रेसचा शिकार देखील होतात. प्रत्येकवेळी आपण सुंदरच दिसलो पाहिजे असा अट्टाहास असणाºया या अभिनेत्री फॅशन डिझायनरचे महागडे कपडे अंगावर चढवताता दिसतात. ग्लॅमरच्या या झगमगाटी दुनियेत अभिनेत्रींना नेहमीच अपटूडेट रहावे लागते. परंतू काहीवेळा फारच काहीतरी वेगळे करण्याच्या नादात या अभिनेत्री मात्र काहीतरी विचित्र कपडे घालुन बºयाचजणांचे लक्ष वेधून घेतात आणि चर्चेचा विषय बनतात. काही जण तर मुद्दान चर्चेत येण्यासाठी विचित्र कपडे घालतात. अनेक पुरस्कार सोहळ््यांमध्ये रेड कार्पेटवर आपल्याला अशा अनेक अभिनेत्रींचे लुक पाहायला मिळाले आहेत. अशाच काही चर्चेत आलेल्या अभिनेत्रींच्या लुक्सचे हे खास निवडक फोटो तुमच्यासाठी