LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS RED CARPET
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 13:04 IST
मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यासाठी प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, रेड एफएम रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे टीव्ही न्यूज पार्टनर होते.
LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS RED CARPET
मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यासाठी प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, रेड एफएम रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे टीव्ही न्यूज पार्टनर होते. रेड कार्पेटवर ह्रतिकने आपल्या स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. टायगर श्रॉफ कॅज्युअल लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. राधिका आपटे रे़ड कार्पेटवर अवतरली ती अॅवॉर्डसह तिला ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही रेड कार्पेटवर दिसले. तरुणांमध्ये आदित्य यांच्या स्टाइलची क्रेझ आहे. त्यांना ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन’ देऊऩ गौरवण्यात आले. अमृता खानविलकर रेड कार्पेटवर गाऊऩमध्ये हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी अमृताला ‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ मिळाला. महाराष्ट्राची मोस्ट स्टायलिश सई ताम्हणकरने ही रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. बॉलिवूडमध्ये आपला अभिनय कौशल्यावर वेगळ स्थान निर्माण केलेली सोनाली बेंद्रे आपल्या हटके लूकमध्ये सोहळ्याच्या ठिकाणी दिसली. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही हा अॅवॉर्ड सोहळ्याला अवर्जुन उपस्थिती लावली होती. निर्माते राकेश रोशन यांनी ही रेड कार्पेटवर हजेरी लावली. आपल्या हटके शैलीत तरुणांना ठेका धरायला लावणारी मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे ही रेड कार्पेटवर व्हाइट कलरच्या वनपीसमध्ये अवतरली. निर्माते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर रेड कार्पेटवर दिसले ते स्टायलिश अंदाजात. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर आणि निर्माते अतुल कसबेकर यांनी आपल्या डॅशिंग अंदाजात रेड कार्पेटवर एंट्री घेतली. प्रसिद्ध गायक रुप कुमार राठोड हे ट्रेडिंशनल लूकमध्ये रेड कार्पेटवर दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही रेड कार्पेटवर उपस्थिती लावली. गुलशन ग्रोव्हरने रेड कार्पेटवर "बॅड मॅन" अँटिट्यूडमध्ये एंट्री घेतली. मिथिला पारकर गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवरतली यात ती खूपच सुंदर दिसत होती. मुंबईची मुलगी आरजे मलिष्काही आपल्या बिनधास्त अंदाजात रेड कार्पेटवर अवतरली. तेजस्विनी पंडित ट्रेडिंशनल लूकमध्ये ब्युटिफुल दिसत होती. प्रसाद ओक रेड कार्पेटवर खूप खूश दिसला. चिन्मय मांडलेकर कॅज्युअल लूकमध्ये रेड कार्पेटवर दिसला. भूषण प्राधन रेड कार्पेटवर हँडन्सम हंक दिसत होता. महेश मांजरेकर यांनी आपल्या खास शैलीत रेड कार्पेटवर हजेरी लावली. महाराष्ट्राचा मोस्ट स्टायलिश स्वप्निल जोशीने आपल्या स्टायलिश अंदाजात एंट्री घेतली. गायक ह्रदय गट्टानी रेड कार्पेटवर आपल्या स्टाइलमध्ये अवतरला यावेळी तो खूपच हंडसम दिसत होता.