Join us

​‘बालकदिनी’ जाणून घ्या, तुमच्या आवडत्या स्टार्सनी बालकलाकार म्हणून साकारलेली भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 13:10 IST

आज बालकदिन! बालकदिनाच्या याच मुहूर्तावर जाणून घेऊ यात, तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सचे लहानपण.   स्टारकिड्स असलेल्या यापैकी अनेकजण आज ...

आज बालकदिन! बालकदिनाच्या याच मुहूर्तावर जाणून घेऊ यात, तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सचे लहानपण.   स्टारकिड्स असलेल्या यापैकी अनेकजण आज बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार आहेत. अनेकांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमधील आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. अनेकांचे लहानपण त्यांच्या बॉलिवूडच्या सेटवर गेले आहे.आमिर खानआज आमिर खान बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम बालकलाकार म्हणून आमिर कॅमेºयाला सामोरा गेला होता. त्याचे पिता म्हणजे यशस्वी निर्माते ताहिर हुसैन. ‘मदहोश’ या चित्रपटात सर्वप्रथम आमिर बालकलाकार म्हणून दिसली. यानंतर ‘यादों की बारात’मध्येही त्याने बालकलाकार म्हणून भूमिका वठवली.हृतिक रोशनहृतिक रोशन हा एक स्टार किड्स . त्याचे वडिल राकेश रोशन म्हणजे एक लोकप्रीय कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक़ स्टार किड्स असल्यामुळे हृतिकचे बालपण घरी कमी अन् बॉलिवूडच्या सेटवरच अधिक गेले. राकेश रोशन यांच्याच होम प्रॉडक्शनच्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात  हृतिक बालकलाकार म्हणून झळकला. यात त्याने रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.आलिया भट्टबॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट आजची आघाडीची अभिनेत्री आहे. महेश भट्ट यांची लाडकी लेक असलेल्या आलियाला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. तनुजा चंद्रा यांच्या ‘संघर्ष’ या चित्रपटात आलियाने बाल कलाकार म्हणून पहिली भूमिका साकारली होती.संजय दत्तसंजय दत्तचे आयुष्य म्हणजे वादळी आयुष्य. पिता सुनील दत्त यांच्याच ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटात संजयने लहानग्या कव्वाली गायकाची भूमिका साकारली होती. अजय देवगणअजय देवगण म्हणजे आजघडीचा आघाडीचा अभिनेता. अजयनेही बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुुरुवात केली होती. ‘प्यारी बहेना’ या चित्रपटात अजयने बालकलाकार म्हणून मिथून चक्रवर्ती यांच्या लहानपणीची भूमिका साकारला होती.नील नितीन मुकेशनील नितीन मुकेश हा ८० च्या दशकातील एका मसालापटात बालकलाकार म्हणून दिसला होता. होय, ‘जैसी करनी वैसी भरनी’ या चित्रपटात नीलने ज्युनिअर गोविंदा साकारला होता.उर्मिला मातोंडकर‘लकडी पे काठी, काठी पे घोडा...’ हे गाणे आठवते. या गाण्यातील चिमुकली म्हणजेच उर्मिला मातोंडकर. याच चित्रपटात अभिनेता जुगल हंसराज हाही बालकलाकार म्हणून दिसली होता.