Join us

लेटेस्ट फोटोशूटमध्ये ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे गर्भवती सोहा अली खान, पहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST

अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार असल्याने सध्या पतौडी परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सोहा तिचे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी एकही संधी गमावू इच्छित नसून, तिने नुकतेच फिल्मफेअर साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये सोहा एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे.

अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार असल्याने सध्या पतौडी परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सोहा तिचे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी एकही संधी गमावू इच्छित नसून, तिने नुकतेच फिल्मफेअर साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये सोहा एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे. ३८ वर्षीय सोहा या महिन्याच्या मॅगझिनच्या इश्यूमध्ये बघावयास मिळणार आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् सोहाने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सोहाने पांढºया रंगाच्या टॉपबरोबरच फ्लोरल प्रिंट आणि मोत्यांची कारागिरी केलेला स्कर्ट घातलेला आहे.तिच्या हातात एक प्रॉप आहे. हा प्रॉप मुलांना शांत करण्यासाठी डिझाइन केला जातो. या फोटोला कॅप्शन देताना सोहाने लिहिले की, ‘शांत राहत पुढे जात आहे.’सोहाच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् फोटोग्राफर मीतेश तनेजा यांनीही इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. वहिनी करिना कपूर-खान हिच्याप्रमाणेच सोहादेखील प्रेग्नंसीचा ट्रेण्ड सेट करताना दिसत आहे.गेल्या महिन्यातच सोहाच्या घरी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. यावेळी करिना, तैमूर, करिष्मा कपूर, नेहा धूपिया, कोंकणा सेन-शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित झाले होते. सोहाने २०१५ मध्ये अभिनेता कुणाल खेमू याच्यासोबत लग्न केले होते.