Join us  

IN PICS : ललित मोदींकडे आहे 4500 कोटींची संपत्ती, त्यांची गर्लफ्रेन्ड सुष्मिता सेनही नाही कमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 3:39 PM

1 / 9
सुष्मिता सेन पुन्हा एकदा लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. आता बॉलिवूडची ही ग्लॅमरस अभिनेत्री आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींच्या प्रेमात पडली आहे. ललित मोदींनी खुद्द सोशल मीडियावर अभिनेत्रीसोबतचे पर्सनल फोटो शेअर करत, याचा खुलासा केला.
2 / 9
आम्ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा ललित मोदींनी केला. ललित मोदी बिझनेसच्या दुनियेतील मोठ नाव आहे. दुसरीकडे सुष्मिता सेन ग्लॅमर जगातलं लोकप्रिय नाव आहे. संपत्तीचं म्हणाल तर ललित मोदींकडे अफाट संपत्ती आहे. पण सुष्मिताही कमी नाही.
3 / 9
एका रिपोर्टनुसार, ललित मोदींकडे एकूण 57 कोटी डॉलर म्हणजे, 4555 कोटी रूपयांची प्रॉपर्टी आहे. लंडनच्या प्रतिष्ठित 117, स्लोएन स्ट्रीटवर त्यांचं पाच माळ्यांचं अलिशान मेन्शन आहे. ते 7000 स्क्वेअर फूटांमध्ये पसरलेलं आहे.
4 / 9
सुष्मिता सेनने चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अफाट कमाई केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी सुष्मिता कोट्यावधींची मालकीण आहे.
5 / 9
अभिनेत्री महिन्याला जवळजवळ 60 लाखांची कमाई करते. वर्षाकाठी ती सुमारे 9 कोटी कमावते. तिची नेटवर्थ सुमारे 74 कोटी रूपये आहे.
6 / 9
अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी इतकं मानधन घेते. जाहिरातींच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बल 1.5 कोटींपर्यंत कमाई करते.
7 / 9
सुष्मिता तिच्या दोन दत्तक मुलींसोबत मुंबईच्या वर्सोवा येथील एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्याकडे महागड्या कारचं कलेक्शन आहे.
8 / 9
1.42 कोटींची बीएमडब्ल्यू 7 सीरिज 730 एलडी, 1 कोटीची बीएमडब्ल्यू एक्स 6, 89.90 लाखांची आॅडी क्यू 7 अशा महागड्या कारमधून ती फिरते. एलएक्स 470 ही कारही तिच्याकडे आहे. या कारची किंमत 35 लाखांच्या घरात आहे.
9 / 9
सुष्मिताचं ‘बंगाली माशीज किचन’ नावाचं रेस्टॉरंट होतं. जे आता बंद झालं आहे. चित्रपट, वेबसीरिजशिवाय तिची ‘तंत्र एंटरटेनमेंट’ नावाची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. दुबईत ती एक ज्वेलरी रिटेल स्टोरही चालवते. या स्टोरचं नाव तिने आपल्या लेकीच्या नावावर रेनी ज्वेलरी ठेवलं आहे.
टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी