1 / 9किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari ) ही बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. पिंक, इंदू सरकार या चित्रपटात किर्तीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.2 / 9मसाला चित्रपट करणा-यांपैकी किर्ती नाही. वास्तववादी अभिनयासाठी ती ओळखली जाते. चित्रपट असो की वेबसीरिज किर्तीचा जबरदस्त अभिनय लक्ष वेधून घेतो.3 / 9अर्थात इतकी प्रतिभा असूनही आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत किर्तीचं नाव कुठेही नाही. असं का? असा प्रश्न तिला सतत विचारला जातो.4 / 9आता किर्तीनं याच प्रश्नाचं उत्तर दिलंय. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. केवळ बोलली नाही तर आघाडीच्या अभिनेत्रींना थेट आव्हानही दिलं.5 / 9काम करणारे इंडस्ट्रीत अनेक आहेत. पण माझ्यासारखं काम करणारे मोजके, असं ती म्हणाली.6 / 9 मसाला चित्रपटात कोणीही काम करेल. पण माझ्यासारखं काम करुन दाखवा तर मानेन, असं थेट आव्हानही तिनं दिलं.7 / 9 बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अभिनेत्रींकडे सुंदर दिसून मिरवण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नसतं. म्हणूनच मी जे करु शकते ते या अभिनेत्री करु शकत नाही. कारण त्या भूमिकांमध्ये जीव ओतून काम करावं लागतं. या आघाडीच्या ज्या कोणी अभिनेत्री आहेत, त्यांनी माझ्यासारखं काम करुन दाखवावं मग मी त्यांना मानेन, असं ती म्हणाली.8 / 9पिंक, उरी- द सर्जीकल स्ट्राईक, इंदू सरकार अशा अनेक चित्रपटांत किर्ती झळकली आहे. फोर मोर शॉट्स प्लिज, बार्ड आॅफ ब्लड, क्रिमिनल जस्टीस या वेब सीरिजमुळे ती ख-या अर्थानं प्रकाशझोतात आली.9 / 9 किर्तीनं प्रायोगिक नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने लहानमोठ्या जाहिराती आणि मालिकांमध्ये देखील काम केलं.