Join us  

Hrithik Roshan : “आता मी ती चूक पुन्हा करणार नाही..” म्हणत हृतिकने नाकारला रावणाचा रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 6:20 PM

1 / 10
विक्रम वेधा या सिनेमाकडून हृतिकला माेठ्या अपेक्षा होत्या. पण सिनेमा आपटला आणि हृतिकला मोठा धक्का बसला.
2 / 10
विक्रम वेधा अपयशी ठरल्यानंतर आता हृतिकने एक मोठा सिनेमा नाकारल्याचं कळतंय.
3 / 10
होय, चर्चा खरी मानाल तर रामायणावर आधारित एक बिग बजेट सिनेमा हृतिकने धुडकावून लावला आहे.
4 / 10
दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणावर एक मोठा सिनेमा बनवणार आहे. या चित्रपटातील रावणाची भूमिका हृतिकला ऑफर झाली होती.
5 / 10
आता बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिकने रावणाची भूमिका करण्यास नकार दिला आहे.
6 / 10
आता याचं कारण काय, तर आता म्हणे हृतिकला निगेटीव्ह भूमिकाच नको आहेत. रामायणाची स्क्रिप्ट हृतिकला आवडली होती. पण त्याला निगेटीव्ह भूमिका नको होती.
7 / 10
विक्रम वेधा अपयशी ठरल्यानंतर हृतिकने त्यातून हा धडा घेतला आहे. आता फक्त त्याला हिरोच्या भूमिका हव्या आहेत.
8 / 10
नितेश तिवारींनी त्याची बरीच समजूत काढण्याचे प्रयत्न केलेत. पण हृतिक रावणाच्या भूमिकेसाठी तयार झाला नाही.
9 / 10
अखेर आता नितेश तिवारींनी नव्या अभिनेत्याचा शोध सुरू केल्याचं कळतंय. केजीएफ फेम यशच्या नावाचा विचार मेकर्सनी चालवला आहे.
10 / 10
यश रावणाच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे, असं मेकर्सचं मत आहे. रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याची चर्चा आहे.
टॅग्स :हृतिक रोशनरामायण