Join us  

कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 8:00 AM

1 / 7
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत.
2 / 7
कतरिना कैफ सध्या घरीच असून सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात आहे.
3 / 7
कतरिनाने केर काढतानाचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
4 / 7
या फोटोत केर काढत असतानाच झाडूचा वापर करून तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
5 / 7
कतरिनाने काही दिवसांपूर्वी घरात भांडी घासत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
6 / 7
कतरिनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
7 / 7
एवढेच नव्हे तर दीपिका पादुकोणने देखील हा व्हिडिओ शेअर करत कतरिनाने माझी आयडिया चोरली असे लिहिले होते.
टॅग्स :कतरिना कैफ