Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:10 IST

1 / 13
प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. एका स्टार किडबाबतही असंच घडलं आहे. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली बॉलिवूडच्या सुपरस्टार कुटुंबातील आहे. आज ती बी टाऊनची टॉप अभिनेत्री आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा वडिलांकडे फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पण आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
2 / 13
फोटोमध्ये दिसणारी मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर आहे. करिनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून बी-टाऊनवर राज्य केलं आहे.
3 / 13
करीना कपूर खानने एकदा सांगितलं होतं की सुपरस्टार कुटुंबातील असूनही, ती आणि तिची बहीण करिश्मा कपूर सुरुवातीला आलिशान आयुष्य जगलेल्या नाहीत. अभिनेत्री म्हणाली होती की, तिला आणि करिश्मासा तिची आई बबिता कपूरने एकटीने मोठं केलं.
4 / 13
सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायच्या. करीनाने सांगितलं होतं की, एकेकाळी तिच्या कुटुंबाला ड्रायव्हर देखील परवडत नव्हता. अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.
5 / 13
2011 मध्ये हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना करीना कपूरला विचारलं होतं की, रणबीर कपूरप्रमाणेच तुझाही जन्म एका विशेष कुटुंबात झाला आहे असं वाटतं का? याला उत्तर देताना करीना म्हणाली होती की, 'लोक कपूर कुटुंबाबद्दल जसं विचार करतात, तसं आम्ही ऐषोआरामात वाढलो नाही.'
6 / 13
'माझी आई (बबिता) आणि बहीण (करिश्मा) यांनी मला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी खरोखरच खूप संघर्ष केला. खासकरून माझी आई, कारण ती सिंगल मदर होती, आमच्यासाठी सर्व काही मर्यादित होते.'
7 / 13
'लोलो (करिश्मा कपूर) लोकल ट्रेनमधून कॉलेजला जायची, पण मी वाचले कारण मी इथल्या कॉलेजला गेली नाही. पण मी इतरांप्रमाणे स्कूल बसने गेली. आमच्याकडे कार आणि ड्रायव्हर होता. पण तो खर्च भागवण्यासाठी पैसे नव्हते.'
8 / 13
'आमच्या आईने आम्हाला अशा प्रकारे वाढवले ​​की आम्ही आज आमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत करतो. आम्ही पाहिलेले वाईट दिवस आम्हाला एकाच वेळी खूप मजबूत आणि इमोशनल करतात. या अनुभवांनी मला एक अतिशय स्ट्राँग व्यक्ती बनवलं'
9 / 13
रणधीर कपूर एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची मुलगी करिश्मा कपूरसोबत पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच दरम्यान रणधीर यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा ते त्यांच्या मुली करिश्मा कपूर आणि करीना यांची ट्यूशन फी देखील भरू शकत नव्हते.
10 / 13
रणधीर कपूर यांच्याकडे त्यावेळी पैसे नव्हते आणि पैसे कमवण्यासाठी ते खूप मेहनत करत असे. आज करीना नवाब पतोडी कुटुंबाची सून आणि सैफ अली खानची पत्नी आहे. तिला दोन मुलं आहेत.
11 / 13
आज करीना आलिशान जीवन जगते. ती आलिशान घरात राहते आणि परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेते. तिच्याकडे सर्व सुखसोयी आहेत. करीना कपूरच्या म्हणण्यानुसार तिचे बालपण आर्थिक संकटात गेले पण आज ही अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे.
12 / 13
CNBC TV 18 च्या रिपोर्टनुसार, करीना कपूर खानची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, करीना तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेते. ती प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी पाच कोटी रुपये घेते. झूमनुसार, तिची वार्षिक कमाई 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
13 / 13
टॅग्स :करिना कपूर